कनोली या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील मा. श्री. भाऊसाहेब संतूजी थोरात माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक विद्यामंदिर कनोली या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. कैलास शेळके शेठ (उद्योजक संगमनेर)व खालकर साहेब उपस्थित होते. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष, स.ब.वि.प्र समाज संस्थेचे विद्यमान संचालक,खरेदी विक्री संघाचे संचालक श्री.सिताराम पाटील वर्पे व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी वर्पे, मिनानाथ वर्पे (स.म.भा.थो. स. साखर कारखाना संगमनेर) बंडोपंत वर्पे (ग्रामपंचायत सदस्य), भाऊसाहेब पवार (सरपंच कनोली) नामदेव विठोबा वर्पे (संचालक कनोली विद्यालय)विजय पारखे (संचालक कनोली विद्यालय) प्रकाश वर्पे, ज्ञानदेव वर्पे, गौतम जगताप आदीमान्यवर सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. खरात सर यांनी केले विद्यालयाचे प्राचार्य वर्पे के.एम.सर यांनी अहवाल वाचन केले.श्री.थोरात सर, वर्पे सुभाष सर,यांच्या मार्गदर्शनाने पारितोषिक वितरण संपन्न झाले .आभार श्रीम. देवकर मॅडम यांनी मानले.
