महेश भाऊ पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चा नगर उत्तर जिल्हा च्या कोषाध्यक्ष पदी निवड

नेवासा / लोकवेध live न्यूज /दत्तात्रय शिंदे

नेवासा तालुक्यातील अंमळनेर या छोट्याश्या गावातील, युवा नेतृत्व, मा श्री. महेश भाऊ पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चा नगर उत्तर जिल्हा च्या कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,अंमळनेर येथून समाजसेवेची सुरवात करणारे युवा नेतृत्व महेश पवार यांनी समाज सेवेसाठी अखंड वाहून घेतले आहे, पवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rss)चे स्वयंसेवक असून, भाजपा युवा मोर्चा नेवासा तालुका चिटणीस व भाजपा युवा मोर्चा नगर उत्तर जिल्हा सचिव,पदाची जबाबदारी यशस्वी काम केलं आहे, या पदावर असताना त्यांनी, परिसरातील अनेक गावामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, शालेय साहित्य वाटप, कोरोना काळात गरजू वंताना किराणा किट चे वाटप, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप,डोळ्यांचे मोफत शिबीर, ई श्रम कार्ड मोफत शिबीर असे अनेक काम उपक्रम राबवले आहे, या कामाचीच दखल घेत पक्ष श्रेष्ठिनी त्यांची भाजपा युवा मोर्चा नगर उत्तर जिल्हा कोषध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे, या निवडी बद्दल त्यांचे मा. जिल्हा अध्यक्ष श्री विठ्ठलराव लंघे, मा. आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे साहेब, भाजपा राज्य प्रवक्ते श्री नितीन दिनकर,शिर्डी लोकसभा प्रमुख श्री राजेंद्र गोंदकर, नगर दक्षिण लोकसभा समन्वयक श्री भानुदास बेरड, मा. नगर तालुका अध्यक्ष श्री मनोज कोकाटे, किसान मोर्चा उपाध्यक्ष श्री नितीन उदमले,युवा जिल्हा अध्यक्ष योगेश गोंदकर,युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री सचिन तांबे, शिर्डी लोकसभा विस्तारक श्री योगीराज परदेशीं,मा युवा जिल्हा अध्यक्ष श्री श्रीराज डेरे,युवा नेतृत्व ऋषिकेश शेटे,प्रदेश सदस्य श्री सुभाष पवार,किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री अंकुश काळे यांनी अभिनंदन केले

सर्वसामान्यांना न्याय देणार….पक्ष श्रेष्ठीनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता,भारतीय जनता पार्टी चे विचार तळागाळातील लोकांन पर्यंत पोहचवण्यासाठी काम करणार आहे, तसेच शेतकरी,कामगार व सर्वसामान्य लोकांना न्याय मिळून देण्यासाठी व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे देखील लढा सुरु ठेवणार असल्याचे नवनियुक्त भाजपा युवा मोर्चा नगर उत्तर जिल्हा कोषाध्यक्ष श्री महेश पवार यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!