दोन वर्षे विश्वासाची, दोन वर्षे परिवर्तनाची!

आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या विकासाला नवी दिशा

जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती; शेतकरी, महिला, युवकांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न

संगमनेर विधानसभा मतदारसंघात आमदार अमोल खताळ यांचा दोन वर्षांचा प्रवास पाहताना परिवर्तनाच्या अपेक्षा, विकासाची दिशा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न या बाबी केंद्रस्थानी दिसून येतात. आमदार अमोल खताळ यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना थेट हात घातला, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी उघडपणे मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन वर्षांचा हा टप्पा केवळ कालावधीची पूर्तता नसून, जनतेने दाखवलेल्या विश्वासाची जाणीव करून देणारा महत्त्वाचा क्षण आहे. या टप्प्यावर विकासकामांचा आढावा घेताना झालेल्या कामांची नोंद घेण्याबरोबरच आगामी काळातील आव्हाने आणि जनतेच्या अपेक्षांचाही विचार होत आहे. मात्र या दोन वर्षात आमदार अमोल खताळ यशस्वीपणे मतदारसंघातील विकासकामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्यामाध्यमातून संगमनेरच्या विकासाला नवी दिशा देताना दिसतात.

संगमनेरच्या राजकारणामध्ये परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त करत जनतेने आमदार अमोल खताळ यांना संधी दिली. या संधीचे रूपांतर ठोस विकासकामांमध्ये करण्यासाठी मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांना आमदार अमोल खताळ प्राधान्य देत आहेत. रस्ते, पाणी, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार व ग्रामीण भागातील सुविधा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या विषयांवर काम करण्याची गरज असल्याने आमदार खताळ पाटील यांनी विविध विकासकामांसाठी निधी मिळविणे, प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करणे आणि नागरिकांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचविणे यावर भर दिला आहे.

लोकप्रतिनिधीच्या कामाचे खरे मूल्यमापन केवळ घोषणांवर होत नसते. तर एखादे काम मंजूर होणे, त्याला निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष काम सुरू होणे आणि ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्याने जनतेला त्याचा लाभ मिळणे या प्रत्येक टप्प्याला महत्त्व आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या कामगिरीकडे पाहताना विकासाच्या या सर्व टप्प्यांचा विचार करणे गरजेचे आहे. आमदार अमोल खताळ त्यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत या प्रत्येक टप्प्यावर कौतुकास्पद कामगिरी करत आहेत.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते, पूल आणि अंतर्गत पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मिर्झापूर –धांदरफळ खुर्द रस्त्या साठी सुमारे ६ कोटी ५९ लाख ६६ हजार रुपये, तर चंदनापुरी–शिरापूर पुलासाठी सुमारे ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांच्या कामांचा उल्लेख या विकासप्रवासात महत्त्वाचा ठरतो. सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून ग्रामीण भागाशी संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करत उपलब्ध निधीतून नागरिकांच्या सोईचे दर्जेदार काम करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

संगमनेर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाई व अनियमित पावसाचा सामना करावा लागतो. शेतीचे उत्पादन, जनावरांसाठी चारा-पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व गोष्टी पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे जलसंधारण, सिंचन योजना, पाणीपुरवठा व विहिरींचे पुनर्भरण हे मतदारसंघाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचे विषय आमदार अमोल खताळ सक्षमपणे हाताळत आहेत. साकूर उपसा सिंचन योजनेसाठी सुमारे २१७ कोटी रुपये, भोजापूर चारीसाठी सुमारे ४५ कोटी रुपये आणि घुलेवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे ४२ कोटी रुपयांच्या कामांचा उल्लेख विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या योजनांच्या माध्यमातून पाणी उपलब्धतेत सुधारणा करण्यात येत आहे.

आमदार खताळ यांच्या नेतृत्वाखाली खांबा परिसरातील कामाधेनू उपसा सिंचन योजना व अन्य जलसंधारणाच्या कामांबाबतही कामाचा दर्जा, वेळेत पूर्तता आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाणी मिळणे या मुद्द्यांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. केवळ योजना मंजूर होणे पुरेसे नसून पाण्याचा प्रत्येक थेंब शेतापर्यंत पोहोचणे हेच या योजनांचे अंतिम यश मानले गेले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा उपलब्धता, विहीर पुनर्भरण आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांसाठी प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. आगामी काळात कायमस्वरूपी जलव्यवस्थापन, पावसाचे पाणी अडविणे आणि भूजलपातळी वाढविणे यावर अधिक भर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

संगमनेरची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. ऊस, दूध व्यवसाय, भाजीपाला आणि अन्य पिकांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. नैसर्गिक आपत्ती, पाणीटंचाई, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी मांडणे, सिंचनाच्या सुविधा वाढविणे, रस्ते आणि वीजपुरवठ्याच्या समस्या सोडविणे तसेच कृषीविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विकासकामांचा लाभ शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्न वाढीत आणि शेतीच्या खर्चात बचत होण्यात यापुढील काळात दिसेल अशी अपेक्षा आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योग, शीतगृहांची उपलब्धता, दुग्धव्यवसायाला चालना, शेतमाल विक्रीसाठी सक्षम बाजारपेठ आणि तरुण शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा जवळच्या परिसरात उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. महिला व बालकांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र १०० खटांचे रुग्णालय उभारणे रुग्णालयांतील आवश्यक साधनसामग्री आणि आपत्कालीन उपचारव्यवस्था सक्षम करण्यासाठी आमदार अमोल खताळ महायुती सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, माता-बाल आरोग्य, रुग्णवाहिका आणि दुर्गम भागातील वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा केली जात आहे. यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांनी तालुक्यात नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून त्यांची कामे प्रगतीपथावर सुरू आहे.

संगमनेर मतदारसंघातील युवक रोजगाराच्या संधींच्या शोधात आहेत. शिक्षण पूर्ण करूनही स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध न झाल्यास अनेक तरुणांना मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागते. त्यामुळे संगमनेरमध्ये औद्योगिक विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराला चालना दिली जात आहे. याशिवाय महायुती सरकारच्या माध्यमातून पठार भागातील कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. पुढील काळात एमआयडीसी पुरक इतरही बाबींची पूर्तता करून लवकरच औद्योगिक वसाहत उभारणी होणार आहे. यासाठी आमदार अमोल खताळ यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.

आमदार अमोल खताळ हे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून कार्य करताना महसूलविषयक प्रश्न, शासकीय दाखले, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आणि विविध योजना यासंदर्भात नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेशी उत्कृष्ट समन्वय साधत आहेत. सातत्यपूर्ण जनसंपर्कातून नागरिकांच्या सूचना त्यांच्या प्रश्नांची नोंद, संबंधित विभागाकडे पाठपुरावा आणि वेळेत उत्तरदायित्व यामुळे नागरिकांना सुलभ व्यवस्था अनुभवण्यास मिळत आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करत लोहार, निळवंडे, मांंची फाटा, वडगाव पान, धांदरफळ बुद्रुक-खुर्द आणि वरवंडी फाटा या ठिकाणी आधुनिक प्रवासीनिवारे उभारण्याच्या प्रस्ताव देण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अशा सुविधा उपयुक्त ठरणार आहेत. संगमनेर आगाराला १५ लालपरी आणि जिजाऊ एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून अत्याधुनिक २५ इलेक्ट्रिक शिवाई बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी ११ इलेक्ट्रिक बस प्रवाशांना सेवा देत आहेत.

संगमनेर तालुक्यात धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांच्या विकासाला वाव आहे. त्यामुळे निजर्णेश्वर, पेमगिरी आणि बाळेश्वर यांसारख्या ठिकाणांवरील पर्यटनविकासाच्या कामांना चालना देण्यात आली. याचा पुढील काळात स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होईल. धांदरफळ येथील बिरोबा महाराज मंदिर परिसरात रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि पथदिव्यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. धार्मिक स्थळांचा विकास करताना स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहनतळ, सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धन यांचाही समतोल राखला जात आहे.

दोन वर्षांच्या कार्यकाळात विविध विकासकामांना चालना देण्याचे प्रयत्न झाले असले, तरी संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय, दर्जेदार रस्ते, ग्रामीण आरोग्यसेवा, स्थानिक रोजगार, शेतीला शाश्वत आधार, शिक्षणाच्या सुविधा आणि नागरी समस्यांचे निराकरण करणे ही आव्हाने आजही महत्त्वाची आहेत. विकासाच्या प्रत्येक कामाचा नियमित आढावा घेणे, कामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे, विलंबाची कारणे स्पष्ट करून नागरिकांना वस्तुस्थितीची माहिती दिली जात आहे.

आमदार अमोल खताळांनी जनतेच्या विश्वासाला न्याय देत राजकीय दृष्ट्या दोन वर्षांच्या अल्प कालावधीत विकासकामांचा वेग, कामांचा दर्जा आणि सर्वसामान्यांच्या जीवनात होणारा सकारात्मक बदल या सर्व बाबींकडे ठोस असे पहिले पाऊल टाकले आहे. तसेच दोन वर्षांचा हा टप्पा पुढील वाटचालीसाठी परीक्षण आणि नव्या संकल्पाची संधी आहे. पुढील काळातील विकासकामांतून जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याची जबाबदारी आमदार अमोल खताळ यांच्यावर असणार आहे.

शब्दांकन-: गोरक्षनाथ नेहे पाटील
जनसंपर्क अधिकारी आमदार अमोल खताळ पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!