केशव भांगरे यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर.
राजूर / लोकवेध live न्यूज
सन्मान निष्ठेचा,गौरव कर्तुत्वाचा याप्रमाणे महाराष्ट्र राज्य,महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू संजीवनी फाऊंडेशन आयोजीत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ अकोले(नवलेवाडी) येथील पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्मचारी दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे यांना जाहीर झाला आहे.
शनिवार दि. २ मार्च २०२४ रोजी मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर येथे सदर पुरस्काराचे वितरण होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,खासदार सदाशिव लोखंडे,विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे,आमदार डॉ.किरण लहामटे,माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे,पद्मश्री तात्याराव लहाने,नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,महासचिव उत्कर्षाताई रूपवते,युवानेते विवेकभैया कोल्हे, कृष्णराज महाडिक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण संपन्न होत आहे.
दिव्यांग केशव भांगरे यांनी महाराष्ट्रातील १०० गड,किल्ले सर करण्याची स्वप्नपूर्ती केली आहे. आजपर्यंत केशव भांगरे यांना दिव्यांग भूषण पुरस्कार,कलारत्न भूषण,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड,अनेक सन्मानपत्र यांसह तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत केले आहे. सर्वात अवघड हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा १९०० फुटी रॅपलिंग करणारा महाराष्ट्रातील पहिलाच दिव्यांग व्यक्ती म्हणून त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.यासह महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर १२ वेळा सर केले आहे.कळसुबाई शिखरावर १११ दिव्यांग भटकंती मोहीम पार केली आहे.महाराष्ट्रातील सागरी किल्ले ३ दिवसात १० किल्ले सर केले आहेत २५०पेक्षा जास्त महाराष्ट्र व इतर राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भटकंती केलेली आहे.या कर्तुत्वामुळेच त्यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
