कलाभूषण रघुवीर खेडकर 25 मे रोजी होणार पदमश्रीने सन्मानित

संगमनेर (प्रतिनिधी)

अवघ्या महाराष्ट्रात तमाशा कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना येत्या 25 मे रोजी देशाच्या अतिशय प्रतिष्ठित अशा पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने अवर गृहसचिव कमलेश रबिदास यांनी आजच (दि. 15 ) या सोहळ्याचे तपशील पाठवले आहेत. 25 मे 2026 रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार सोहळ्याची रंगीत तालीम होणार आहे तर त्याच दिवशी सायंकाळी राष्ट्रपती भवनात पाच वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रघुवीर खेडकर यांना पदमश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राची अस्सल लोककला अशी ओळख असलेल्या लोकनाट्य तमाशा क्षेत्रात रघुवीर खेडकर हे पद्म पुरस्कार मिळवणारे पाहिले कलाकार ठरले आहेत. दिल्ली येथे होणाऱ्या पद्म पुरस्कार सोहळ्याला रघुवीर खेडकर यांचे मानस बंधू डॉ. संतोष खेडलेकर आणि व्यवस्थापक शफी शेख हे सोबत असणार आहेत.

माझे मानस बंधू डॉ. संतोष खेडलेकर यांनी आज दुपारी पद्म पुरस्काराचा इमेल आल्याचा फोन केला आणि माझे मन भूतकाळात गेले. माझे वडील तमाशामहर्षी तुकाराम खेडकर आणि आई कांताबाई सातारकर यांनी तमाशा क्षेत्रात घेतलेले कष्ट आठवले. स्वातंत्र्योत्तर काळात तमाशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या कलावंतांमध्ये माझ्या आई वडलांचे मोठे योगदान होते. माझा हा पुरस्कार मी या दोघांच्या चरणी अर्पण करतो.

ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!