पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

नाशिक / लोकवेध live न्यूज 

विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञानाची कास धरु, प्रत्येक घटना जीवनातील चौकस बुद्धीने सिद्ध करू श्रद्धा अंध श्रद्धेच्या बेडीतून मानवास आता मुक्त करू. २८ फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे अतिशय उत्साहात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांचा पेहराव परिधान करून त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. विद्यालयातील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित सुंदर गीत प्रस्तुत करून विज्ञानाची माहिती सर्वांना करून दिली. विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी रोबोट नृत्य सादर करून विज्ञानाने बनविलेला अविष्कार रोबोट याच्या कार्याची महती पटवून दिली. विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेल्या आपल्या विज्ञान नाटकाने सर्वांना पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर करू नका, झाडे तोडू नका इत्यादी प्राकृतिक घटकांचे रक्षण करण्याची जाणीव करून दिली. विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प विज्ञान दिनानिमित्त विविध प्रकल्प सादर केले त्याचबरोबर त्यांनी बनवलेल्या प्रकल्पासाठी कोणकोणते साहित्यांचा वापर केला व ते प्रकल्प भविष्यात कसे उपयुक्त आहे याची माहिती पटवून दिली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीचे विद्यार्थी देविका आणि सोहम यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!