निळवंडे धरणाची मान्यता मा मंत्री बि जे खताळ पाटील यांनी दिली याचा विसर पडता कामा नये –  शुभम देशमुख
पिंपरणेत जे खताळ पाटील यांची जयंती साजरी
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच साहित्य क्षेत्राच्या पटलावरील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचा गांधीजींच्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग होता.१९६२ ते ८० च्या काळात २० वर्षे ते आमदार होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी पाटबंधारे मंत्री यासह अनेक खात्याची जबाबदारी सांभाळली 
प्रत्येक खात्यावर त्यांची विशेष अशी छाप होती. त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली होती.निळवंडे धरणाची मान्यता मा मंत्री बि जे खताळ पाटील साहेब यांनी दिली याचा विसर पडता कामा नये
पिंपरणे गावच्या विकासासाठी त्यांचे खूप मोठे योगदान होते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख यांनी केले
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे मंत्री बी जे खताळ पाटिल यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण देशमुख, ग्रा प सदस्य उत्तमनाना राहींज, तुकाराम चिखले,रामदास भादेकर, रमेश राहीज, भास्कर साळवे, भीमा राहींज, कैलास काळे राजू काळे अजित मांडे त्रिंबक जोर्वेकर, पंपू देशमुख,पोपट साळवे, गोकुळ काळे, संचित भारती,चंदू देशमुख,लावरे मामा, कारभारी राहिंज,चंदू ठोंबरे कैलास साळवे विजय साळवे  आदी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होते
 देशमुख पुढे म्हणाले की कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, पुण्याचे चासकमान , नांदेडचे विष्णुपुरीसह राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे काम त्यांच्याच काळात झाले होते. कडक शिस्त, कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांची राज्यात विशेष ओळख होती.
 कार्यक्रमाचे आयोजन शुभम देशमुख मित्र मंडळाने केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!