*गुणवंत विद्यार्थ्यांनी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावे. राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे*

(*गुणवंत विद्यार्थी सोहळा प्रसंगी व्यक्त केले मनोगत*)

निमगाव जाळी / अशोक गोसावी

 

के.आर. जोंधळे कृषी व ग्राम विकास सेवाभावी संस्था निमगाव जाळी ता. संगमनेर यांचे वतीने रविवार रोजी के. आर.जोंधळे सभागृहात इ. १०वी व १२ वी विद्यार्थी व इतर गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब यांचे शुभहस्ते व प्रसाद यशवंतराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवाजीराव जोंधळे यांनी सांगितले की भावी समाज पिढी निर्माण करण्यासाठी आजच्या गुणवंतांनी अथक परिश्रम घेणे गरजेचे आहे. उद्याच्या चांगल्या व निरोगी समाजाची निर्मिती आजचा गुणवंत युवाच करू शकतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला यातूनच चांगल्या भावी नागरिकांची निर्मिती होईल. राज्याचे जलसंपदा विभागाचे उपसचिव सतीशराव जोंधळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचे उपसचिव सतीशराव जोंधळे,प्रवरा बॅंकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे मा.चेअरमन ठकाजी थेटे, संस्थेचे मा.अध्यक्ष सुनीलदादा डेंगळे.मा.सरपंच अमोल जोंधळे, लोकनियुक्त सरपंच प्रतिभाताई जोंधळे,उपसरपंच वैभव वदक,संस्थेचे अध्यक्ष अशोकराव वदक ,प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव डेंगळे, सोमनाथ जोंधळे, ज्ञानेश्वर डेंगळे, दिलीप वदक,प्राचार्य दीपकराव डेंगळे, प्राचार्य,बाबासाहेब गागरे, सुमित डेंगळे,संजय थेटे,राम गायकवाड, सुभाष खरात शिक्षणप्रेमी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर रसाळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!