कानिफनाथ वस्ती शाळेतील तीन विद्यार्थ्यांची केंद्रीय नवोदय विद्यालय साठी निवड
 संगमनेर / लोकवेध live न्यूज 
मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानिफनाथ वस्ती (निळवंडे) येथील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असून जवाहर नवोदय विद्यालयात निवड होण्याची शाळेची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये साईनाथ तुकाराम पवार,प्रथमेश शिवनाथ आहेर,आरव मच्छिंद्र पाटोळे या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे
      निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. सलग पाच वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी नवोदय विद्यालयात निवड होत आहे. चालू वर्षी देखील कानिफनाथ वस्ती शाळेतील तीन विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून शाळेतील शिक्षक व विदयार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
 या विद्यार्थ्यांना संगिता पाटोळे व व  अशोक हांडे यांनी मेहनत घेऊन मार्गदर्शन केले.
विदयार्थ्यांच्या या यशाबद्दल निळवंडेच्या  सरपंच शशिकला पवार,  उपसरपंच भाऊसाहेब जनार्दन आहेर, .प्रभाकर  पवार,.दिपक पवारl.सुनंदा पवार व सर्व सदस्य ग्रामपंचायत निळवंडे, तंटा मुक्ती अध्यक्ष.शिवाजी आहेर, .उत्तम गणपत पवार,.प्रकाश पंढरीनाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते.सुनिल उकिर्डे, बाळासाहेब पंढरीनाथ पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष .राजेंद्र हरिभाऊ पवार, उपाध्यक्ष.मोनाली शरद पवार, शाळा व्यवस्थापन समिति सदस्य, सर्व पालक व ग्रामस्थ पंचायत समिती चे  गटविकास अधिकारी .अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी .बाळासाहेब गुंड, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक  त्रिभुवन, केंद्रप्रमुख j.आशा घुले तसेच वडगाव पान केंद्रातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकानी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!