पिंपरणेत ग्रामदैवत लक्ष्मीआई यात्रा उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील नवसाला पावणारी लक्ष्मी आई देवी यात्रा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात पार पाडला यात्रा उत्सवा निमित्त यावर्षी विविध धार्मिक  कार्यक्रम पार पडले  दि ७ रोजी सकाळी देवीला गंगा स्नान घालुन अभिषेक करून महाआरती करण्यात आली .
यावेळी गावचे सरपंच नारायण मरभळ,उपसरपंच मिनीनाथ  जोर्वेकर सर,काकासाहेब गायकवाड, अण्णासाहेब वाकचौरे सर, दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम, राजेंद्र देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष अरुणसाहेब देशमुख, बाबासाहेब राहिंज सर, पोलीस पाटील विनोद साळवे, रामराव देशमुख सर, गंगाराम वाकचौरे,अजित मांडे, निलेश बागुल, उत्तमनाना राहिंज, अजित देशमुख सह ज्येष्ठ व्यक्तिमत्व शिवराम वाघचौरे रामनाथ ठोंबरे सुखदेव गायकवाड किसन साळवे उमाजी जोर्वेकर भीमा राहिंज आदी उपस्थित होते
परंपरेनुसार गावातील सर्व देवी देवतांना शेंदूर लावणे हा कार्यक्रम झाला देवीला शेंदूर लावण्याची परंपरा आहे त्यानुसार देवीला शेंदूर लावण्यात आला आणि यात्रेला सुरुवात झाली  भाविकांनी सकाळपासून दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती तर काहींनी आपली नवसपूर्ती केले सायंकाळी देवीचा छबिना चोळी पातळ  मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर देवीची महापूजा करून सामूहिक देवीची आरती घेण्यात आली त्यानंतर देवी समोर जागरण गोंधळ करण्यात आला  त्यानंतर आकर्षक फटाक्यांची आतिशबाजी चा कार्यक्रम झाला   यात्रेनिमित्त लक्ष्मी आई मंदिरावर तसेच गावातील सर्व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्री प्रकाश अहिरेकर सह निलेश कुमार अहिरेकर  यांचा लोकनाट्य मनोरंजनाचा कार्यक्रम झाला  दिनांक ८ रोजी सकाळी  तमाशाच्या हजऱ्यांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी पाच वाजता  कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला यावेळी जिल्हाभरातून आलेल्या पैलवानांनी आपली ताकद आजमावली  तर यावेळी  तरुणींच्या कुस्त्यांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांची पारणे फिटले  यात्रा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी आई यात्रा कमिटी,सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील गावातील विविध संस्था , यासह शंकरराव देशमुख,राहुल निकम, सनी राहिंज,किशोर जोर्वेकर,संजय बागुल, राहुल बागुल, निलेश चत्तर, सुधीर रोहम, संतोष राहिंज,निलेश रोहम, कल्याण जोर्वेकर, बाळासाहेब निकम, पोपट साळवे, शुभम काळे, संतोष देशमुख सर, संतोष वाकचौरे संदीप ठोंबरे, अनिल ठोंबरे  या तरुणांनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!