पिंपरणेत लक्ष्मीआई यात्रा उत्सवास ७ मे पासून प्रारंभ
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील जागृत देवस्थान लक्ष्मीआई मातेच्या यात्रा उत्सववास मंगळवार  7 मे  पासून प्रारंभ होत आहे. यात्रा उत्सव दि 7 व 8 दोन दिवस यात्राउत्सव असणार आहे यात्रा उत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवसाला पावणारी लक्ष्मीआई अशी ख्याती असलेल्या या देवस्थानच्या ठिकाणी राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी ७ सात वाजता अभिषेक व ८ वाजता होम हवन करून देवीची महाआरती होणार आहे दिवसभरात देवीला नैवेद्य, नारळ, पेढा, ओटीभरण, गुळाची शेरणी असा प्रसाद चढविला जातो. ज्या भाविक भक्तांनी वर्षभरात केलेला नवस फेडण्यासाठी
मोठ्या संख्येने भाविक भक्त येता असतात. सायं ७ वाजता देवीचा छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून फटाक्यांच्या आतिषबाजीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात गाजत असलेल्या नामवंत बँन्ड व सनई-चौघडा यां पारंपारिक वाद्य पद्धतीने निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. या नंतर लक्ष्मीआई मंदिरासमोर फटाक्यांची आतिषबाजी होऊन मिरवणुकीची सांगता होणार आहे. आठ वाजता देवीची महापूजा व जागरण गोंधळ  त्यानंतर रात्री १० वाजता प्रकाश अहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता प्रकाश अहिरेकर यांचा हजेरी कार्यक्रम होणार असून सायंकाळी ५ वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा  कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे. यात्रा उत्सवा निमित्ताने लक्ष्मी आई मातेच्या मंदिरासह गावातील सर्व मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान दोन वर्षापासून कोरोनाच्या निर्बंधामुळे बंद असलेल्या यात्राउत्सव यावर्षी प्रथमच सुरू होत असून या वर्षी सार्वधिक गर्दी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!