श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व पायी दिंडीचे जिल्ह्यात स्वागत.!!

संगमनेर / लोकवेध live न्यूज / दत्तात्रय घोलप

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी व पालखी नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील संगमनेर तालुक्याच्या पारेगाव बुद्रुकच्या अश्विनाथ महाराजांच्या पावन भूमीमध्ये आगमन होताच जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन व पारेगाव बुद्रूक गावच्या ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त फुलांची उधळण करत स्वागत केले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून २० जून रोजी श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. सदर पालखीमध्ये डोईवर तुळस घेऊन महिला भाविक तर गळ्यात टाळ घालून पुरुष भाविक भक्त लाखोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत.सर्वच भाविक भक्त विठ्ठल नामाच्या जयजयकारात तल्लीन झाले होते.अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व पारेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने पारेगावच्या सरपंच संध्याताई गडाख यांच्या वतीने पालखी सोहळ्याचे भक्तीभावाने स्वागत करण्यात आले.यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,पालखी सोहळ्याचे प्रमुख अध्यक्षा कांचनताई जगताप,डी वाय एस.पी.सोमनाथ वाघचौरे,पी.आय.देविदास ढुमणे,सरपंच डॉ.संध्याताई गडाख,डॉ.डी.एम.गडाख,वकील त्रिंबक गडाख,उपसरपंच गणेश गडाख,विठ्ठलराव घोरपडे,अमोल खताळ,यांसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी,भाविक, प्रशासनाचे सर्व पदाधिकारी,पोलीस प्रशासन पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते.सदर पालखी त्र्यंबकेश्वर नाशिक,सिन्नर तालुक्यातील विविध गावातून मार्गक्रमण करत पायीदिंडी पालखीचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील निराहाळे या गावातून या पालखीचे अ.नगर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनीनाथ महाराजांच्या गडावर टाळ मृदंगाच्या गजरात ४ वाजेच्या दरम्यान आगमन झाले.अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक देविदास देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.संध्याकाळच्या वेळी पारेगाव बुद्रुक याठिकाणी हरिपाठ व महाआरती संपन्न झाली.तदनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!