ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनो ध्येयवादी बना – अनिल येवले सर
गोडगे प्रतिष्ठानच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न
संगमनेर /लोकवेध live न्यूज
मुलांनी इयत्ता दहावी-बारावीच्या यशानंतर पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभावी संवाद कौशल्य, जागतिक भाषांचे आकलन करणे, तंत्रज्ञानाबद्दल माहिती करून घेणे, आत्मविश्वास बाळगणे तसेच अपार मेहनत व कष्ट करण्याची तयारी ठेवणे या पंचसूत्रीचा अवलंब करावाजीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने अथक परिश्रम करून ध्येय साध्य करावे व आपल्या आई-वडिलांचे देशाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन मोटिवेशनल ट्रेनर युवकांचे प्रेरणास्थान श्री अनिल येवले सर यांनी व्यक्त केले
श्री देवराव नारायण गोडगे प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि २ जून रोजी संस्कृती मंगल कार्यालयामध्ये तळेगाव व परिसरातील दहावी, बारावी परीक्षेमध्ये विशेष गुण मिळवणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली झाली त्याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवश्री अभिजीत आहेर सर तळेगावचे सरपंच श्री मयूर दिघे कवठे कमळेश्वर चे उपसरपंच नवनाथ भाऊ जोंधळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे तळेगावचे मा. उपसरपंच रमेश भाऊ दिघे ,सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिरडे मेजर महेंद्र सोनवणे प्राचार्य हरिभाऊ दिघे सर, शरद भागवत शिवाजी देवराम गोडगे अमोल भाऊ पाडेकर सह परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठानचे हे तिसरं वर्ष आहे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा यावेळेस सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शाल, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी,रुग्णांसाठी तसेच सामाजिक काम आजपर्यंत केलेले आहे इथून पुढे हे काम असंच चालू राहील कोणताही पुरस्कार हा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला अधिकच ऊर्जा मिळवून देत असतो
अशा प्रकारच्या सामाजिक कार्यातून आमच्यासारख्याना ऊर्जा मिळते असे प्रतिपादन डॉ. नंदकुमार गोडगे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामदास आहेर सर व गणेश दिघे सर यांनी केले आभार एडवोकेट अविनाश गोडगे यांनी मानले आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद फुलून आला होता.
