संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या श्री.संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाची दुरुस्ती करावी-पत्रकार दत्तात्रय घोलप..!!
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक, काकडवाडी फाट्या मार्गे चिंचोली गुरव-तळेगाव दिघे रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा आहे.सदर रस्त्याचे येणाऱ्या काळात डांबरीकरण करण्यात यावे. माञ सध्या तरी संबंधित प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात यावी. यामार्गी 26 ते 27 जुन दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक येथील सर्वश्रेष्ठ श्री.संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी व भाविक आषाढी वारी निमित्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.आषाढी वारी निमित्त लाखो भाविक हे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात.दिंडी सोहळ्यातील भाविकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केली आहे.सदर मार्गाचे सध्यातरी तात्पुरत्या स्वरूपात मुरुमीकरण करण्यात यावे.सदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत ते बुजवण्यात यावेत अशी मागणी पत्रकार दत्तात्रय घोलप यांसह शिवशाहीर शरद महाराज ढवळे,बाबासाहेब महाराज गायकवाड व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
