गाढवाची दाढी करून अनोखे आंदोलन ;निमोणचे सरपंच संदीप देशमुख यांच्या आंदोलनाची राज्यभर होते चर्चा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील निमोण गावचे सरपंच संदीप देशमुख यांनी गाढवाची दाढी करून अनोख्या आंदोलन केले या आंदोलनाची राज्यभर होते चर्चा
1100 लोकांच्या संगमनेर तालुक्यातील निमोण महसुली गावामध्ये समावेश करण्याचा आदेश न काढणाऱ्या झोपलेल्या कलेक्टर ऑफिसला जाग येण्यासाठी तसेच निमोण गावामध्ये सुरू असलेले अवैद्य वृक्षतोड करणाऱ्या वखारी तात्काळ बंद करण्यात याव्यात यासाठी निमोण ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच संदीप भाऊ देशमुख व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी गाढवाचे दाढी आंदोलन सरपंच संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी निमोण ग्रामपंचायतचे सरपंच संदीप देशमुख यांच्यासहित निमोण ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य मंडळ उपस्थित होते.https://youtu.be/mssCXROyivk?si=FjE0jaKWVXc_nnWS
