अण्णाभाऊ साठेंची ओळख नव्या पिढीला होणे गरजेचे – मंजाबापू साळवे
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शिक्षणाच्या कुठल्याही विद्यापीठात न जाता स्वयम् साक्षर झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जीवनाच्या शाळेतच अभ्यास केला आणि थोर साहित्य संपदा निर्माण केली अशा थोर साहित्यिकाची व त्यांच्या साहित्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली परंतु त्याची ओळख व त्यांचे साहित्य सर्वांसमोर फार कमी आले आहे हे दुर्दैव गोष्ट आहे त्यामुळे सर्व समाजातील साक्षर यांनी व तरुण पिढी नि साहित्यप्रेमींनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची ओळख संपूर्ण जगाला करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मंजाबापू साळवे यांनी केले आहे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे छत्रपती चौकात पिंपरणे ग्रामस्थ व अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आले
ज्येष्ठ कार्यकर्ते शिवराम वाकचौरे व अरुण देशमुख अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली
अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना ते बोलत होते यावेळी छत्रपती दूध संस्थेचे चेअरमन शिवराम वाकचौरे तंटामुक्ती अध्यक्ष अरुण देशमुख सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देशमुख मंजाबापू साळवे सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव राहिंज, संचालक नवनीत देशमुख गगनगिरी दूध संस्थेचे चेअरमन रवींद्र देशमुख उत्तमनाना राहिंज किसन साळवे रमेश राहींज कांताराम भालेराव, सुधाकर कर्पे पोपट साळवे रमेश साळवे आदी प्रमुख मान्यवर अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते
