बॅनरबाजीला फाटा, समाजसेवेला प्राधान्य; वाटापूरमध्ये आधार व NCMC कार्ड शिबिर

महेश पवार यांच्या पुढाकारातून वाटापूरमध्ये नागरिकांसाठी मोफत आधार सेवा व NCMC कार्ड सुविधा

नेवासा / दत्तात्रेय शिंदे 

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस नुकताच 22जुलै रोजी संपन्न झाला, कार्यकर्त्यांनी कोणताही बॅनर बाजी व इतर अनावशक खर्च न करता सामाजिक कार्य करून वाढदिवस साजरा करण्याचं, शुभेच्छा देण्याचं आवाहन केलं होत, त्यानिमित्ताने राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून भाजपा युवा मोर्चा चे अहिल्या नगर उत्तर जिल्हा उपाध्यक्ष महेश पवार यांच्या पुढाकारातून, सहकार्याने वाटापूर याठिकाणी नागरिकांसाठी, आधार सेवा व महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाचे (एसटी ) तिकीट सवलत साठी लागणारे NCMC कार्ड शिबीर हा उपक्रम घेण्यात आले.यामध्ये आधार कार्ड दुरुस्ती, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड अपडेट करणे अशी विविध काम नागरिकांचे व लहान मुलांचे समस्या सोडवण्यात आल्या, तसेंच अमृत जेष्ठ नागरिक योजने अंतर्गत 75 पेक्षा वरील जेष्ठाना 100% एसटी तिकीट माफ,जेष्ठ नागरिक योजने अंतर्गत 65 वर्ष वरील ना 50% तिकीट माफ,महिला सन्मान योजने अंतर्गत 10 वर्ष पुढील सर्व महिलांना 50% तिकिटात सवलत मिळते त्यासाठी त्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC कार्ड बंधनकारण करण्यात आले आहे, कार्ड नसेल तर 100% तिकीट चे पैसे द्यावे लागणार असा नियम करण्यात आला आहे हे कार्ड देखील या शिबिरात नागरिकांना काढून देण्यात आले, घरपोहोच गावामध्ये नागरिकांना ही सेवा मिळाल्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणी तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारण्याची गरज पडणार नाही या उद्देशाचे हे शिबीर ठेवले असे यावेळी बोलताना महेश पवार यांनी म्हंटले. वाढदिवसाच्या निमित्त रबावलेल्या या शिबिराचे नागरिकांनी स्वागत केले, कौतुक समाधान व्यक्त केले त्यावेळी वाटापूर गावचे सरपंच मा. रावसाहेब कदम,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष महेश पवार व अनेक ग्रामस्थ, लाभार्थी नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!