बिबट्याच्या हल्ल्यामध्ये,४ वर्षाचा चिमूरडा गंभीर जखमी ; तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु
संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी मधील घटना
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील चेतन दत्तात्रय सूर्यवंशी यांची दोन मुले
 विपुल सूर्यवंशी व विवेक सूर्यवंशी  हे दोन भाऊ ओट्यावर खेळत असताना अंधाराचा फायदा घेत त्यातील विपुल याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी  येथे शुक्रवारी रात्री आठ वाजता घडली.
 भावाला बिबट्याने पकडल्याचे पाहून विवेक मोठ्याने ओरडत घरात पळाला असता त्यांची आई वर्षा सूर्यवंशी वडील चेतन सूर्यवंशी बाहेर येऊन समोरचे दृष्य बघताच त्यांची भितीने गाळण उडाली. अशाही अवस्थेत त्यांनी आरडा ओरड केली यावेळी  शेजारी धावून आले आणि  बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली असली तरी या घटनेत चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये विपुलच्या मानेवर, कानावर  खोलवर  मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्यातुन मोठा रक्तस्त्राव सुरु होता.
जखमी अवस्थेतच या चिमुरड्याला संगमनेर  ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी  विपुल याच्या प्रकृतीची चौकशी केली व
वन विभागाने  तात्काळ निमगाव टेंभी येथे पिंजरा लावला आहे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार  विपुल च्या प्रकृतीत सुधारणा होत आहे
 वन विभागाने  तात्काळ निमगाव टेंभी येथे पिंजरा लावला आहे
चौकट
संगमनेर-अकोले तालुक्यात बिबट्यांचा रहीवास मोठ्या संख्येने आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. विशेषतः लहान बालकांनादेखील बिबट्याने आत्तापर्यंत लक्ष्य केल्याने वनविभागाचे स्थानिक अधिकारी मात्र
यासंदर्भात फारसे गंभीर दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!