आगामी सर्वच निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकविणारच -आ खताळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढ दिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
विधानसभा निवडणुकीमध्ये जसा या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला तसाच भगवा आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती साखर कारखाना नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकिमध्ये महा युतीचा भगवा फडकवायचाच आहे. त्या साठी सर्व शिवसैनिकांनी जास्तीतजास्त शिवसेनेची सभासद नोंदणी करावी असा सल्ला आ अमोल खताळ यांनी दिला.
संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने बसस्थानकावर राज्याचे उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, शिवसेना वाढ विण्यासाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ शिव सैनिकांचा सन्मान तसेच गोरगरीब अनाथ मुलांना फळे आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, राजेंद्र सोनवणे, रमेश काळे ,शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार खताळ म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या वर आणि या मतदारसंघातील मतदारांवर शिवसैनिकांवर जो विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही .समाजकारणा बरोबरच राजकारण असे धोरण उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्या धोरणाप्रमाणे काम करून केंद्राच्या आणि राज्याच्या लोक कल्याणकारी योजना तळागाळातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी काम करावे असा सल्ला त्यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना दिला
प्रास्ताविक शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहरप्रमुख अजित जाधव यांनीकरून उपस्थितांचे आभार मानले
शिवसेनेची सर्वाधिक नोंदणी करणारे शिवसैनिक सौरभ देशमुख यांच्यासह सुशील शेवाळे व दिपाली वाव्हळ यांचा आ अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी वयोवृद्धांना काठी कमरेचा आणि मानेचा पट्टा देऊन सन्मान करण्यात आला.या वेळी मागास वर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष मांजाबापू साळवे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार ,महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दिपाली वाव्हळ ,भाजप महिला आघाडी तालुकाप्रमुख कविता पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ राहुल खताळ आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह शहर आणि तालु क्यातून आलेले शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य महिला कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी जे काम केले ते न भूतो न भविष्य असे झाले आहे .आणि आता ते उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे ते आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवतील आणि या मतदार संघा साठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास कामांना गती देतील यात अजिबात शंका नाही
श्री विठ्ठल घोरपडे
जिल्हा संघटक शिवसेना
संगमनेरातील १०१ ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान
शिवसेनेसाठी जीवाचे रान करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहणारे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करणार्या शंभर ते सव्वाशे जेष्ठ शिवसैनिकांचा आ अमोल खताळ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला
आधार रक्तपेढीच्या वतीने घेण्यात आले ल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असे मानून उपस्थित असलेल्या महायुतीच्या असंख्य कार्य कर्त्यांनी यावेळी रक्तदान केले तर तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना तसेच रिमांड होम मधील अनाथ मुलांना शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले
