मालदाडकर दहशतीखाली; सलग दोन दिवस बिबट्यांचे हल्ला नाट्य ; सहा गंभीर ; सात ते आठ जणांवर प्राणघातक हल्ला ,

मक्याच्या शेतात मादीसह तीन तगडे बिबटे दबा धरून ; बाहेर पडणे बनले मुश्किल तर नानज रोड निंबाळ्यात बिबट्याचा मुक्त संचार

संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे

सलग दोन दिवस मालदाड रोडवर मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यांनी ये जा करणा-या नागरिक आणि वाहनावर हल्ला सत्र सुरूच ठेवले असल्याने मालदाडवासी
भयंकर दहशतीखाली असल्याने आजूबाजूच्या परिसरातही भीतीचे वातावरण पसरले असून घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

या बाबत हकीकत अशी की, बुधवार दि. 28 ला सायंकाळी 6:30 ला तर गुरूवारी दि. 29 ला रात्री 7:45 ला बिबट्याने वस्तीवरील बालवाडीच्या शाळेजवळ ये जा करणा-या नागरिक व वाहनावर हल्ला नाट्य करीत चांगलाच उच्छाद मांडला आहे. यामध्ये आठ जणांवर हल्ला करीत सहा जणांना गंभीर जखमी केले. तर एक जण चित्यासारखा सुसाट वेग असलेल्या वाहनामुळे बचावला. या थरारा सत्रात  सहाजण गंभीर जखमी असून ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी तर अन्य काहीचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने मालदाडकर वन विभागावर चांगले भडकले असून आमचा जीव जाण्याची वाट बघणार का ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला. सलग आठ दिवसा पासून संगमनेर ग्रामीण भागातील मालदाड परिसरात कारखाना रोडवर रात्रंदिवस हा युध्दाचा बाका प्रसंग सुरू आहे. या भागात
मादीसह अन्य तीन ते चार तगडे बिबटे भक्षासाठी भ्रमंतीकरीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मालदाड गावतील संजय प्रभाकर नवले वय 49, वावी चे संतोष काटे वय वर्षे 34, पंढरीनाथ राऊत वय 69 मालदाड, श्री मेंगाळ व अन्य दोन युवकांवर या बिबट्याने हल्ला केला. तर एक जण नाव माहीत नाही तसेच संजय नवले यांचा मुलगा अल्केश वय 22 यांच्यावर बिबट्याने प्राण घातक हल्ला केला. ही घटना घडण्यापूर्वी संजय नवले यांचे चिरंजीव अल्केश वय 22 हे आपल्या दुचाकी वरून घरी जात असताना बिबट्याने त्याचा पाठलाग केला व हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामध्ये अल्केशची जीन्स फाटली पण तो हल्ल्यातून बचावला खरा. परंतु काहीच क्षणार्धात त्याचे वडील संजय नवले हे घरी जात असताना याच बिबट्याने त्यांच्या पोटीरी व पायाच्या पंज्याला चांगलाच चावा घेत गाडीवर चढला. ब्रेक लावल्याने बिबट्या खाली पडला. दरम्यान ते गंभीर जखमी झाले. दुचाकी चालवत असताना बिबट्यासह फरफटत गेले व बिबट्या गाडीच्या खाली अडकल्याने संजय नवले बचावले. तेवढ्यात प्रसंगावधान राखत त्यांच्या चिरंजीवांने बांबूने बिबट्याला हुसकावत वडिलांना वाचवले. बिबट्याने आपला मार्गक्रमण करत समोर आलेल्या संतोष काटे यांच्यावर हल्ला चढवला
संजय काटे म्हणाले की रस्त्यावर बिबट्याने झडप मारली. बोकांडी बसला. दोघांच्या झटापटीत पाठीला जब्बर मार लागला. दोघेही नळीतील खोल खड्ड्यात पडल्याने त्यातून माझी सुटका झाली. त्यांच्या हाताला जोराचा चावा घेत घायाळ केले. चालत्या वाहनावर हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले.
पंढरीनाथ राऊत म्हणाले की, गुरूवारचा बाजार करून रात्री 7:30 आम्ही दोघेजण गाडीवर जात असताना बिबट्या अंगावर धावून आला आणि मांडीला चावला. मित्राला मात्र इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांतर लगेच पुढे श्री मेंगाळ या गृहस्थासह आणखी दोन मुलांना मादीने जखमी केल्याचे गावक-यांनी सांगितले. सदरची घटना ही वस्तीवरील बालवाडी शाळेजवळ घडल्याने येथील लहान मुलांचा जीव धोक्यात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही दिवसापूर्वी ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती परंतु वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता वन अधिकारी बळी जाण्याची वाट पाहत आहेत का ? असा संतप्त सवाल ग्रामस्थानी केला. परंतु घटना घडल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी पिंजरे लावल्याचेही काही ग्रामस्थांनी सांगितले. घटना घडली त्यावेळेस मदतीसाठी इंद्रजीत थोरात, मालदाड गावचे सरपंच गोरक्ष नवले, विलास नवले, मंगेश नवले यांनी जखमींना मदत केली. जखमींवर कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू असून संजय नवले म्हणाले की, औषधोपचार केला असून सायंकाळी डिस्चार्ज मिळाला आहे. तर उपचार सुरू असल्याचे राऊत व
काटेंनी सांगितले. वनविभाग अधिकाऱ्यांनी भेट घेतल्याचेही ते म्हणाले. या भागात तात्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. नानज रोड, निंबाळ्यात बिबट्याचा लक्षणीय मुक्त संचार वाढल्याने वनविभागाने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!