पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथील शिक्षक प्रविण कदम यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

नाशिक / लोकवेध live न्यूज 

पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर चे समन्वयक प्रविण कदम यांना सायन्स ओलंपियाड फाउंडेशन नवी दिल्ली तर्फे सर्वोत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रकमेचा समावेश आहे. यानिमित्ताने त्यांनी एस. ओ. एफ चे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रविण कदम यांनी शालेय स्तरावर उत्कृष्ट असे एस. ओ. एफ परीक्षेचे आयोजन पार पाडले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्व कार्यासाठी त्यांना शाळेच्या प्रा. डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!