स्वामित्वधनाची रक्कम भरून आठ दिवसांत खदाणी सुरू करा-ना.विखे पाटील
व्यावसायिक आणि अधिकार्याच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
तालुक्यातील खाण क्रशर व्यावसायिकांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा दिलासा असून,खाण क्रशर चालकांना झालेला दंड निकषात बसवून रद्द करून फक्त स्वामित्वधनाची रक्कम भरून आठ दिवसांत खदाणी सुरू करण्यास परवानगी देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
मागील पंधरा दिवसांपुर्वी मुंबई येथे खाण चालक व्यावसायिकांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून आपल्या समस्या सांगितल्या होत्या.याबाबत अधिकार्यांनी सर्व व्यावसायिकांचे व्यक्तिगत अर्ज घेवून समस्या आणि त्यावरील उपाय योजनाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देवून पंधरा दिवसात याबबात निर्णय करण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली होती.
आज पुन्हा सर्व अधिकार्याची मंत्री विखे पाटील यांनी बैठक घेवून व्यावसायिकांना कसा दिलासा देता येईल याबाबत विचार विनिमय करून घेण्यात आलेल्या निर्णयांची माहीती व्यावसायिकांना याप्रसंगी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे तहसिलदार धीरज मांजरे भाजपाचे विधानसभा प्रमुख अमोल खताळ शरद गोर्डे संदीप देशमुख श्रीकांत गोमासे यांच्यासह तालुक्यातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने अवैध उत्खनापोटी तसेच वाहतुकीसाठी झालेला दंड कायद्याच्या निकषातम बसवून रद्द करून स्वामित्वधनाची रक्कम भरून घेण्याचा मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय करतानाच स्वामित्वधनाची रक्कम भरून घेतल्यानंतर आठ दिवसांत खदाणी सुरू करण्यास परवानगी देण्याच्या सूचना प्रांताधिकारी आणि तहसिलदारांना दिल्या.
खाणपट्यांच्या नूतनीकरणाचे प्रलंबित असलेले जिल्हाधिकारी
व शासन स्तरावरील प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले असून भविष्यात जिल्हा गौण खनिज आराखड्यामध्ये असलेल्या गटांमध्येच वाहतूक परवाने देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून वाहतूक परवाने घेवून आणि नियमांचे पालन करून उत्खनन करण्याबाबत त्यांनी अधिकरी आणि व्यावसिकांच्या बैठकीत सांगितले.
