शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी अखेर शिवसैनिकच सरसावले

ने 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान भगवा सप्ताह

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान भगवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रभर भगवा सप्ताह निमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहे,शिवसेना घराघरात पोहोचवण्याचे काम देखील सुरू आहे परंतु संगमनेर तालुक्यात मात्र असं काहीच घडत नसल्याने प्रामाणिक शिवसैनिक अस्वस्थ होते,त्यातच मुंबईतील संपर्कप्रमुख व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी प सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा आदेशाचे तंतोतंत पालन करावे विद्यमान पदाधिकारी जर काही करत नसतील तर तुम्ही शिवसैनिक म्हणून उद्धव साहेबांचे हात बळकट करा त्यांच्या आदेशाचे पालन करीत शिवसैनिक पुढे सरसावले व भगवा सप्ताह निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभासद नोंदणी अभियान सुरू केले, संगमनेर मधील सर्व पदाधिकारी शिवसैनिक एकत्रित आले शिवसेना शेतकरी सेना युवा सेना, महिला आघाडी, रिक्षा सेना, वाहतूक सेना,ग्राहक संरक्षण कक्ष, आरोग्य सेना, व्यापारी आघाडी या सर्व पदाधिकारी व माजी पदाधिकारी यांनी मिळून शहरातील बस स्थानक जवळ शिवसेना सभासद नोंदणी अभियान सुरू केले सकाळी 10वाजता सुरू झालेल्या अभियानात दुपारी 03 वाजेपर्यंत 500 सभासद नोंदणी फार्म भरण्यात आले सभासदांना लगेचच सभासद कार्ड लॅमिनेशन करून देण्यात आले शिवसेना सदस्य नोंदणी अभियान शिवसेनेचे संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे संपर्क संघटिका बेबीताई लांडगे व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर भाऊ कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले नागरिक युवक व्यापारी व्यावसायिक शेतकरी बांधव यांचा सभासद नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकाच दिवसात 500 सभासद नोंदणी करण्यात आली याबाबत पक्षाचे वरिष्ठ संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे विश्वनाथ जी नेरूळकर व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना माहिती कळवण्यात आल्यानंतर शिवसैनिकांचे व सभासद नोंदणी उपक्रमाचे कौतुक केले सकाळी 10 वाजता शिवसेनेच्या संपर्क संघटिका बेबीताई लांडगे यांच्या हस्ते नवीन सभासदांना शिवसेना सभासद नोंदणीचे कार्ड वाटप करून सदस्य नोंदणीस सुरुवात करण्यात आली शिवसेनेच्या सदस्य नोंदणीस प्रतिसाद बघता महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल व महाविकास आघाडीचे सरकार येईल सूर्यकांत जी शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी शिवसेनेचे महिला संपर्क प्रमुख बेबीताई लांडगे मा शहर प्रमुख अमर कतारी मा तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे, युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, संघटक असिफ तांबोळी, विजु सातपुते, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, वाहतूक सेना शहर प्रमुख ईम्तायज शेख, जिह्वा समन्वयक फैसल सय्यद पठार भाग तालुका युवा प्रमुख , योगेश खेमनर, व्यापारी सेना शहर प्रमुख संभव लोढा, तालुका संघटक राजु सातपुते, शेतकरी सेनेचे पंकज पडवळ, आरोग्य सेना जिल्हा प्रमुख अजिज मोमिन,स्वप्निल उंदावत, समन्व्यक दिपक सांळुखे उप तालुका प्रमुख ,एकनाथ खेमनर, युवासेना शहर प्रमुख गोंविद नागरे,नारायण पवार,मुन्ना शिकिलकर,मुस्तकिन शेख, उप शहर प्रमुख अक्षय गाडे, उप तालुका प्रमुख अश्वि प्रकाश गायकवाड,प्रकाश चौथवे,त्रिलोक कतारीमहिला तालुका प्रमुख शीतल हासे उप जिल्हा प्रमुख आशा केदारी महिला शहर प्रमुख संगीता गायकवाड, माजी शहर प्रमुख प्रसाद पवार प्रमोद कुलट रोमान सय्यद रहीम बेग, देविदास वराडे, भगवान पोपळघट भाऊसाहेब वराळे उप शहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी दीपक वनम ग्राहक सारंक्षक कक्षाचे सदाशिव हासे रिक्षा सेनेचे शहर प्रमुख अशोक बढे, उप तालुका प्रमुख शरद कवडे, आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!