पंजाबराव डख हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरतोय, 14 मार्चपासून पुन्हा पाऊस
 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
लोकवेध live न्यूज 
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस या कालावधीत पाहायला मिळाला. हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. 4 मार्च ते 8 मार्च पर्यंत बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात गारपिट देखील झाली. याशिवाय अहमदनगर, पुणे, नासिक, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस या कालावधीत पाहायला मिळाला.
यामुळे शेतकरी बांधवांचे काढणीसाठी आलेले रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच फळबाग आणि भाजीपाला पिके भुईसपाट झालीत. गारपिटीमुळे आणि वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव ढक यांनी 14 मार्चपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळेल असा अंदाज बांधला आहे. डखं यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 14 मार्च ते 18 मार्चपर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे. संपूर्ण राज्यात भाग बदलत या कालावधीमध्ये पाऊस पडणार आहे. 18 मार्च नंतर देखील राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान राहील आणि पाऊस कोसळू शकतो. जवळपास 26 मार्चपर्यंत वातावरण खराबच राहील असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.
यवतमाळ आणि नांदेड तसेच इतर पूर्व विदर्भातील जिल्ह्यात या कालावधीमध्ये गारपीट होईल असा अंदाज पंजाब रावांनी बांधला असून गारपीटीची आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपली व आपल्या शेती पिकांची तसेच पशुधनाची काळजी घेण्याची गरज यावेळी निर्माण झाली आहे.
पंजाब रावांचा हवामान अंदाज ठरतोय खरा 
 पंजाबरावांनी 28 फेब्रुवारी रोजी एक हवामान अंदाज वर्तवला होता. त्यावेळी त्यांनी राज्यात 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्र अहमदनगर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर सह विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.
त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता आणि 4 मार्च ते ८ मार्च दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस कोसळला होता. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली असल्याने हा देखील अंदाज जर सत्यात उतरला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!