शेतकऱ्यांच्या  नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ खताळ
आमदार अमोल खताळ यांचे तहसीलदार कृषी अधिकारी गटविकास अधिकार्यांना निर्देश

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या गावांची आ.खताळ यांनी केली पाहणी.

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे

मागील वेळेस तोंड पाहून पंचनामे केले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती . मात्र आता अधिकार्यांनी ज्या शेतकर्यांचे खर्या अर्थाने नुकसान झाले आहे. अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकर्याच्या बांधावरजाऊन पंचनामे करावे असे निर्देश आ. अमोल खताळ यांनी तहसीलदार उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले.
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ धांदरफळ मिर्झापूर नांदुरी दुमाला कौठे धांदरफळ नांदूर खंदरमाळ आणि जांबुत या गावात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन आमदार अमोल खताळ यांनी अधिकार्याच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली सर्वप्रथम कोठे धांदरफळ येथील निवृत्ती म्हतारबा घुले यांच्या मालकीच्या दोन गाईंवर विज पडून दगावल्या होत्या. त्यांच्या गोठ्याला भेट देत पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पशुवैद्यकीय अधिकार्यांना दिले.आणि शासनाच्या वतीने जी काही मदत लागेल ती मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
नांदुरी दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीवरती झाड पडून भिंत पडली त्या ठिकाणची आ खताळ यांनी पाहणी केली. तसेच याच गावातील नामदेव दगडू कोठवळ यांचा कांदा,राहुल दत्तू कवडे यांच्या काढणीस आलेल्याद्राक्ष बागेची,सुरेश काशिनाथ शेटे यांच्या कांदा शिवाजी मारुती शेटे आणि गजानन नेहे, यांची डाळिंब बागेची पाहणी आ. खताळ यांनी केली.मिर्झापूरचे गणेश वलवे यांचा टोमॅटो ,शिवाजी रभाजी दिवटे यांची शेड नेट मधील सिमला मिरची, अशोक नाना वलवे यांचे ऊस धांदरफळ येथील बाबा साहेब भाऊ खताळ यांचा गहू,सावरगाव तळ येथील सोमनाथ शंकर थिटमे तसेच साहेबराव बाळाजी कचरे यांनी साठवून ठेवलेल्या कांदा तसेच दत्तू गंगाधर शेळके व संतोष एकनाथ नेहे यांच्या शेतातील कांदा आणि उन्हाळी बाजरीची पाहणी आमदार खताळ यांनी केली तसेच नांदूर खंदरमाळ आणि जांबुत येथील नुकसान ग्रस्त भागाचे सुद्धा तात्काळ पंचनामे करण्यात यावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यात आ. अमोल खताळ यांच्या समावेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, उपतालुकाप्रमुख बादशहा गुंजाळ कोठे धांदरफळ येथील, नेताजी घुले, मारुती घुले, नांदुरी दुमाला येथील ऍड मीनानाथ कवडे, सोमनाथ नेहे मिर्झापूर येथील अनिल निळे साहेबराव वलवे, धांदरफळ खुर्द येथील संजय खताळ कैलास गोडसे उमेश कोकणे सावरगाव तळ येथील बाळासाहेब शेटे ,शरद नेहे ,परसराम नेहे, बबन गाडे बाळासाहेब थिटमे, लक्ष्मण नेहे सुरेश भालेराव यांच्यासह तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार सुभाष कदम, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड,तालुका कृषी अधिकारी, रेजा बोडके मंडल कृषीअधिकारी पंकज कवाड, कृषी सहाय्यक भारती मोरे, कल्याणी धाडे, गंगाराम ढोले महसूलचे मंडलाधिकारी कामगार तलाठी व ग्राम सेवक यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!