मतदारांचा थोरात साहेबांना उत्स्फूर्त पाठिंबा- रणजितसिंह देशमुख
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहराला वैभवशाली बनवणारे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ संगमनेर ग्रामीण होणाऱ्या सर्व संवाद फेऱ्यांना ग्रामीण भागास वाड्यावस्त्यावर  नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आमदार थोरात यांचे नेतृत्व तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले असल्याचे मत राजहंस संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी ग्रामीण भागात प्रचार करताना  केले आहे.
संगमनेर विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रचारार्थ आज रायते, वाघापूर, खराडी, देवगाव, जाखुरी, कोळवाडे  येथे पायी  प्रचार  करताना राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी मतदार बंधू भगिनींनी आमदार थोरात साहेब यांनाच मतदान करण्याचे आश्वासन दिले कारण यावेळी मतदान करताना आमदार थोरात साहेब हे मुख्यमंत्री म्हणूनच मतदान करायच आहे अशी भावना मतदारांनी व्यक्त केली
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार असून आमदार बाळासाहेब थोरात यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे आवाहन रणजितसिंह देशमुख यांनी केले.
यावेळी विविध गावातील नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!