टाकळी शाळेत गणतंत्र दिवस व संविधान सोहळा उत्साहात साजरा
टाकळी (अकोले) लोकवेध live न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे भारताचा अमृत महोत्सवी ७६ वा गणतंत्र दिवस व घर घर संविधान सोहळा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने टाकळी शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी यांच्या समूहगान, नृत्य, रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व व निबंध इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या प्रसंगी गावातून काढण्यात आलेल्या संविधान रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व विभागांचे कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. “आमचे संविधान, आमचा अभिमान” “७६ वा गणतंत्र दिवस चिरायू होवो” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. टाकळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब फोडसे यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन व नेत्रदिपक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टाकळी शिक्षक वृंद डॉ. श्रीनिवास पोतदार, संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे, संजय शिंदे, शुभांगी साबळे, कल्पना पवार, श्रीकांत मेंगाळ, निता लेंभे व प्रविण आल्हाट यांनी विशेष परिश्रम घेतले.
