शिवसेना शिंदे गट ओबीसी व्हीजेएनटीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदिप राज भोंडे
अहिल्यानगर : लोकवेध live न्यूज

शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी व्हीजेएनटीच्या अहिल्यानगर उत्तर विभाग जिल्हाध्यक्षपदी प्रदीपराज भोंडे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे व शिवसेनेचे व्हिजेएनटी-ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आहिल्यादेवी होळकर शेती मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील शिवसेना बाळासाहेव भवन येथे मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शिवसेना व्हिजेएनटी-ओबीसीचे बाळासाहेच किसवे यांच्या हस्ते अहिल्यानगर उत्तर विभाग
शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अहिल्यानगर उत्तर विभागाच्या ओबीसी व्हीजेएनटीच्या जिल्हाध्यक्षपदी अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा आदी तालुक्यासाठी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील प्रदीपराज भोंडे, यांची निवड करण्यात आली.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष व उपजिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष भोंडे म्हणाले की, आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण सक्रियपणे प्रचार प्रसार करणार आहे. तर पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार आहे.
जिल्हाध्यक्ष प्रदीपराज भोंडे यांसह आदी मान्यवरांच्या निवडीने त्यांचे शिवसेना सह सचिव एकनाथ शेलार, महाराष्ट्र राज्य समन्वयक मारोती जानकर, धुळे जिल्हाप्रमुख तथा सोशल मिडीया राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय कुसळकर, नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने, पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे, शिवसेना जालना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र लाड आदींसह बाळासाहेब किसवे यांनी सर्व नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष भोंडे यांच्या निवडीने सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
