राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त विभाग अकोले तालुका अध्यक्षपदी संजय फुलसुंदर यांची निवड
अहिल्यानगर / लोकवेध live न्यूज
अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त विभागाच्या अकोले तालुका अध्यक्षपदी संजय रामचंद्र फुलसुंदर यांची निवड करण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अकोले तालुका भटके विमुक्त विभागाच्या अध्यक्षपदी कोतुळ येथील संजय रामचंद्र फुलसुंदर यांची अकोले तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड यांनी नुकतीच ही निवड करण्यात आल्याचे जाहीर केले आहे श्री संजय फुलसुंदर यांचे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून त्यांची ही निवड केली आहे
युवक कार्यकर्ते संजय फुलसुंदर यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड ,प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस त्रिशा मधेवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाअध्यक्ष कपिल पवार ,ज्येष्ठ नेते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर आदींनी श्री संजय फुलसुंदर यांचे अभिनंदन केले आहे
अकोले तालुक्यात पक्ष वाढीसाठी काम करणार राज्यात महायुतीचे महायुतीचे सरकार असून राज्य सरकारच्या विविध योजना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे विचार आणि ध्येयधोरण सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचे व या पुढील काळात पक्ष वाढीसाठी जोमाने काम केले जाईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय फुलसुंदर यांनी सांगितले——–