भारतीय बौद्ध महासभेच्या संगमनेर शहर कार्यकारिणीचे पुनर्गठन उत्साहात पार पडले
नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून बौद्ध विचारधारेचा प्रचार आणि संघटन बळकट करण्याचा निर्धार
संगमनेर, / लोकवेध live न्यूज
भारतीय बौद्ध महासभा, संगमनेर शहर शाखेच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन रविवारी दुपारी १ वाजता सिद्धार्थ विद्यालय, संगमनेर येथे अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. या विशेष कार्यक्रमात शहरातील विविध बौद्ध कार्यकर्ते, उपासक, उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु. शांताराम रणशूर हे होते. यांच्यासह ज्येष्ठ मार्गदर्शक आयु. बिपिन गायकवाड, आयु. नरेंद्र पवार आणि आयु. रावसाहेब पराड यांनी उपस्थितांना बौद्ध तत्त्वज्ञान, संघटनाचे महत्त्व आणि नव्या कार्यकारिणीची जबाबदारी या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड – युवा नेतृत्वाचे स्वागत
शहर शाखेच्या पुनर्गठित कार्यकारिणीत पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली:
- शहर प्रमुख – आयु. विनय घोसाळे
- सचिव – आयु. सचिन साळवे
- कोषाध्यक्ष – आयु. दिलीप भोरूंडे
यासह विविध समित्यांमध्ये पुढील पदाधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत:
- उपाध्यक्ष (संस्कार समिती) – आयु. बाबासाहेब मोकळ
- प्रचार व पर्यटन समिती प्रमुख – आयु. तेजस घोसाळे
- संरक्षण समिती प्रमुख – आयु. जयराज दुशिंग
- हिशोब तपासणी – अमोल कदम
- कार्यालयीन सचिव – आयु. अश्विनीकुमार बोर्डे
- संस्कार विभाग सचिव – आयु. रवी दिवे, आयु. ऋषिकेश घोलप
- प्रचार व पर्यटन सहायक – आयु. दिलीप पराड
- संरक्षक पद – निलेश कुसरे, चंद्रकांत जाधव
- संघटक मंडळ – आयु. राजेंद्र भालेराव, आयु. दीपक तपासे, आयु. चंद्रकांत खरात, आयु. विनोद गायकवाड, आयु. संतोष गायकवाड, आयु. अमोल गायकवाड, आयु. अंकुश माघाडे
- मार्गदर्शक – आयु. रघुनाथ भालेराव सर
कार्यक्रमाचे नियोजन आणि आवाहन
या कार्यक्रमाचे नियोजन व संचालन संगमनेर तालुका बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु. अशोकराव गायकवाड यांनी उत्तमरीत्या पार पाडले. त्यांनी उपस्थितांचा उत्साह वाढवून नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी आयु. विनय घोसाळे, आयु. सचिन साळवे आणि आयु. दिलीप भोरुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत, संगमनेर शहरामध्ये बौद्ध धम्म, समता, बंधुता आणि प्रबोधनाचे मूल्य प्रभावीपणे रुजवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी बौद्ध बांधवांना आवाहन केले की – “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आणि धम्म जीवनात उतरण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा.”
एकजुटीचे व नवचैतन्याचे पर्व
या कार्यक्रमाने संगमनेर शहरामधील बौद्ध चळवळीला एक नवचैतन्य प्राप्त करून दिले आहे. नव्या नेतृत्वामुळे कार्यतत्परता, संघटन आणि सामाजिक भान यामध्ये निश्चितच सकारात्मक बदल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
