जिल्हा परिषद टाकळी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

टाकळी अकोले  /लोकवेध live न्यूज

“तू सोच, तू सपने देख*

तू  सभी जंजीरे तोड

तू पढ, तू आगे बढ ||”

उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य उपकेंद्र टाकळीच्या डॉ. उज्ज्वला वैद्य होत्या. यावेळी टाकळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच महिलांचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. या निमित्ताने टाकळी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी उपस्थित महिला भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व व नारीशक्तीचा इतिहास याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सामुदायिक महिला सन्मान शपथ घेण्यात आली.  टाकळी शाळेचे उपाध्यापक श्री. संजय देशमुख यांनी महिलांची सुरक्षितता याबद्दल प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. उज्ज्वला वैद्य यांनी महिलांना ताणतणावाचे व्यवस्थापन व निकोप आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी टाकळी पंचक्रोशीतील कर्तृत्ववान महिला भगिनी डॉ. उज्ज्वला वैद्य, विद्याताई तिकांडे, शुभांगी साबळे, कल्पना पवार, निता लेंभे, छाया नाईकवाडी, कमल चासकर, मिना वाटाणे, सविता गाडे, लहानबाई गोरे, शोभाताई भरीतकर, पद्मावती सुर्वे यांना सन्मानित करण्यात आले. उपाध्यापक श्री. संजय शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!