गरुड झेप प्रतिष्ठान च्या वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियानाचे सातत्यपूर्ण 7 वर्षे पूर्ण करत 19 वा जागतिक विक्रम.
नाशिक / लोकवेध live न्यूज
गरुड झेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गडकोट संवर्धन , गोदावरी स्वच्छता अभियान , बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान गेली 7 वर्षे सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे.
25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे .याचे 19 जागतिक विक्रम झाले आहेत . रायझिंग स्टार इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स , ब्राहो इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स ,लंडन यामध्ये नोंद झाली आहे .
आज नाशिक मध्ये हेल्मेट चा वापर अनेक पटीने वाढला आहे . समाज वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे .नाशिक अपघात शून्य करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागर आवश्यक आहे. गेली 7 वर्षे गरुड झेप चे कार्यकर्ते – संगीता भानोसे , संकेत भानोसे, अविनाश क्षीरसागर , अजिंक्य तरटे ,सागर बोडके ,अंजली प्रधान ,रेणू भानोसे अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत . सातत्यपूर्ण 2557 दिवस एखाद्या अभियान राबवणे यासाठी चिकाटी , सकारात्मक विचार,जिद्द, नियोजन,निर्णयक्षमता, सृजनशीलता आवश्यक आहेत.
गरुड झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संदीप भानोसे ,संगीता भानोसे, रेणू भानोसे, अंजना प्रधान ,सागर बोडके, चंद्रकांत नाईक, मंगेश तरगे , अविनाश क्षीरसागर, संजय फडके,रविन्द्र कुलकर्णी, प्रसाद देशपांडे, मनोहर उपासनी, हेमंत पुराणिक, अरुण कुलकर्णी, संकेत भानोसे ,रॉयल रायडर्स नासिक रोड चे अध्यक्ष राजू रूपवते व हिरवा कुर फाउंडेशनचे अध्यक्ष निलय बाबू शाह ,नलिनीताई शाह ,राखी दिदि शाह व वेलीना दीदी इतर मित्र यांच्यासोबत अभियान यशस्वीरित्या राबविले.
पुढील टार्गेट सातत्यपूर्ण 3 हजार दिवस असे गरुड झेप चे अध्यक्ष संदीप भानोसे यांनी जाहीर केले.
