घारगांव पोलीस ठाण्यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

घारगाव / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव पोलीस ठाण्यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७ वी जयंती मोठ्या उत्साहात शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी साजरी करण्यात आली.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, शोषित,वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बहुजनांच्या विकासाचा समतेचा व पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्व धर्म समभाव, बंधुता,समता जोपासण्याचे काम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाला समतेचा विचार दिला. बहुजनांच्या विकासाचा विचार करून आयुष्यभर काम केले. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. समाजाच्या कल्याणासाठी मानवतावादाचा विचार दिला आहे असे घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी मनोगत व्यक्त करत अभिवादन केले.

तर यावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे पोलिस हेड कॉन्स्टेबल चांगदेव नेहे, नारायण ढोकरे प्रमोद गाडेकर, गणेश तळपाडे , सामाजिक कार्यकर्ते सुदेश आहेर यांसह आदि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!