अवैध धंद्यांच्या विरोधात संगमनेर शहर शिवसेनेच्या (ठाकरे गट) घंटानाद आंदोलनाला पोलीस प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
अंदोलनाच्या धास्तीने शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंदला आजपासूनच सुरुवात
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
संगमनेर शहर व तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी मटका अवैध मद्य व गुटखा विक्री, वाळू तस्करी, आणि जुगार तसेच कत्तलखान्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे सांगत माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात घंटानाद आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसैनिक कारणी पोलीस स्टेशन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत घंटानाद आंदोलन केले.अवैध धंद्यांच्या मुळे संगमनेरात दोन गटात तणाव निर्माण होऊन अशांतता होते म्हणून अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी केली तसेच याचे पर्यावसान वादात होते व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तसेच ह्या अवैध धंद्यांना पाठीशी घातल्याने अवैध धंदा करणारे व्यवसायिक हे दादागिरी करत नागरिकांना वेठीस धरतात असे मत युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरेयांनी व्यक्त केले तसेच गुन्हेगारी व व्यसनाधीनतेचे प्रमाण यामुळे वाढते आहे. त्यामुळे मटका, जुगार, वाळू तसेच मद्य व गुटखा विक्री बंद व्हावी यासाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. नेहरू गार्डन ते शहर पोलीस ठाणे ह्या मार्गावरून घंटानाद करत शिवसैनिक व सर्वसामान्य नागरिकांनी अमर कतारी यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे गाठत जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस प्रशासनानेही आंदोलनाची दखल घेत तात्काळ पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित आंदोलकांसोबत चर्चा करत निवेदन स्वीकारत त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले, त्यांच्या म्हणण्यानुसार संगमनेरात बहुतांश अवैध व्यवसाय बंद झाले असून आजपासून ते स्वतः जातीने लक्ष घालून चोरून लपून सुरु असलेले अवैध धंदे पूर्णतः बंद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज स्वतः त्यांनी संगमनेर शहराचा पूर्ण फेरफटका मारला व सर्व अवैध मटका दुकान बंद केल्याचे सांगितले व आपण निवेदन दिल्यानंतर आत्तापर्यंत 25 मटका व्यावसायिकांवर कारवाई केल्याचे देखील सांगितले.तसेच कुठेही बेकायदेशीर मद्य व गुटखा विक्री, मटका जुगार अड्डे आणि कत्तलखाने इत्यादी अवैध धंदे सुरु असल्याचे दिसल्यास त्यांना वैयक्तिक संपर्क करावा आरोपींना कोणतीही मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. ह्या वेळी युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण.मा तालुका प्रमुख राजू सातपुते,शहर प्रमुख गोविंद नागरे
युवासेना विधानसभा प्रमुख- अमोल डुकरे. माजी शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे प्रथमेश बेल्हेकर.आश्वि उप तालुका प्रमुख प्रकाश गायकवाड उपतालुका प्रमुख.भाऊसाहेब वराळे व्यापरी आघाडी प्रमुख.संभवशेठ लोढा उप तालुका प्रमुख.सचिन साळवे रिक्षासेना शहरप्रमुख अशोक बढे विभाग प्रमुखप्रशांत खजूरे वाहतूक सेना शहर प्रमुख.इम्तियाज शेख ज्येष्ठ शिवसैनिक
बाबासाहेब मुसमाडे.सुखदेव कनसे शुभम काळे पंकज हासे सुशांत कतारी जानकीराम भडकवाड ,विजय कोटकर विजय सातपुते दिपक सांळके,कृष्णा गायकवाड, तसेच महिला आघाडीच्या सुमित्रा खची,सपना देसाई,उज्वला म्हाळस सुनंदा खिची लक्मी खिची राखी तडासम. गुड्डी पवार दिशा कतारी साधना पवार गायत्री पवार अशा धरम कतारी.सह अनेक महिला व शिवसैनिक उपस्थिती होते.
