“थोरातसाहेब बॅनरवर नाही तर जनतेच्या हृदयात आहे – बॅनर फाडणाऱ्यांची नीच मानसिकता उघडी पडली!”
नेत्यांच्या नावाचे बॅनर फाडले, पण जनतेच्या मनातील विश्वासाचे ‘बॅनर’ कोण फाडणार?”
“थोरात यांच्या फ्लेक्सची विटंबना : विकृत प्रवृत्तींनी पेटवला संगमनेरचा संताप! – कारवाई न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा”
संगमनेर / लोकवेध live न्यूज
महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत, समतोल आणि विकासाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक असलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या श्रावणमासातील शुभेच्छा फलकाची छेडछाड झाल्याने संपूर्ण संगमनेर तालुका संतप्त आणि खवळलेला आहे. या घृणास्पद, विकृत कृत्याचा तीव्र निषेध करत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
वडगाव पान येथील टोलनाक्याजवळील महादेव मंदिर परिसरात आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात आणि आ. बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छांचा फलक उभारण्यात आला होता. मात्र श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी अज्ञात विकृत समाजकंटकांनी त्या फलकाची विटंबना केली. ही घटना कळताच कार्यकर्त्यांमध्ये संतापाचा स्फोट झाला.
“संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेवर थेट हल्ला करणाऱ्या या प्रवृत्तींना वेळीच रोखा,” अशी आक्रमक मागणी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी करत तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यांनी म्हटले, “जाती-जातींमध्ये फूट पाडणारे, विकासाऐवजी द्वेषाचं राजकारण करणारे हे लोक तालुक्याच्या सामाजिक समतेला सुरुंग लावत आहेत. अशी असहिष्णू प्रवृत्ती जर वेळीच थांबवली नाही, तर संगमनेरचा संयम राखणारा जनतेचा बांध फुटेल!”
यावेळी इंद्रजीत भाऊ थोरात यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करत संयम पाळण्याचे आवाहन केले. मात्र उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष होता.
निलेश थोरात, महेश थोरात, सागर गायकवाड, अनिस तांबोळी, गणेश गडगे यांच्यासह शेकडो युवक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“जर दोन दिवसांत दोषींना अटक झाली नाही, तर युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल. त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल,” असा स्पष्ट इशारा निलेश थोरात यांनी दिला.
सोशल मीडियावर संतापाचा भडका –
संगमनेरकरांचा इशारा: “दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर गनिमी कावा होईल!”फ्लेक्स विटंबनेची बातमी व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाचे वादळ उठले.
“थोरात हे केवळ नेता नाहीत, तर संगमनेरची शान आहेत. त्यांचा अपमान म्हणजे संपूर्ण तालुक्याचा अपमान!”
अशा प्रतिक्रियांनी फीड भरले असून प्रशासनाकडून तातडीने कठोर कारवाईची मागणी होत आहे.
🔻 निष्कर्ष:
शांततेच्या भूमीत विखारी राजकारणाचे विष पेरणाऱ्या विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी संगमनेर आता एकवटला आहे. शांतता राखा – पण अन्याय सहन करणार नाही, हेच नागरिकांचे स्पष्ट विधान आहे!
