निवडणुकीच्या खर्चाचा अहवाल न दिल्याने पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व संचालक मंडळ बरखास्त 
 सोसायटीत प्रशासक राज सुरू
 पिंपरणे / लोकवेध live न्यूज
 निवडणूक झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कालावधीमध्ये नवनिर्वाचित उमेदवारांनी खर्चाचा अहवाल सादर करणे बंधनकारक असते असे न केल्यास त्या उमेदवाराला पदमुक्त केले जाते
सर्वच उमेदवारांना निवडणूक कालावधीत प्रचार, सभा, कार्य अहवाल, जाहीरनामे, झेंडे, चहा, नाश्ता आदींसाठी खर्च करत असतात झालेल्या खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक असते असे असतानाही पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या संचालकांनी निवडणुकीचा खर्चाचा तपशील दिलेला नसल्याने सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे तसेच कारवाई केलेल्या संचालकांना पुढील तीन वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही
 संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी पिंपरणे येथील पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक  सन 2022 ला झाली गावातील सहकार विकास मंडळाची या संस्थेवर सत्ता आली सन 2022 ते सन 2027 पर्यंत संस्थेवर सहकार मंडळाचे चेअरमन व्हा चेअरमन निवडले गेले त्यांची अडीच वर्षे पूर्ण होत असतानाच सोसायटीचे संचालक  भाऊसाहेब (भाऊराव )देशमुख यांनी सर्व संचालक मंडळाने निवडणूक आयोगाला निवडणूक खर्चाचा तपशील दिला नाही असा आरोप केला आणि याचा पुराव्यासह सर्व तपशील 23 मार्च 2025 रोजी उपनिबंधक कार्यालय संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे सादर केला उपनिबंधक कार्यालय अधिकाऱ्यांनी सर्व तपासणी तपासणी करत 23 जून 2025 रोजी पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आणि यापुढे या संचालकांना पुढील तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही असा लेखी आदेश दिला
 आता यापुढे पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सोसायटी या संस्थेचा कारभार प्रशासक बघणार असून या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी राजेंद्र वाकचौरे हे प्रशासक अधिकारी म्हणून काम बघणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!