शिंदोडी येथे हनुमान मंदिराची आरती. मा. सरपंच लक्ष्मण कुदनर यांच्या हस्ते.
साकुर,संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे हनुमान चालीसा सुरू केलेला असून गावातील प्रत्येक जण त्या ठिकाणी आरती करत असतो आणि महाप्रसादाचा देखील आयोजन केले जातं. परंतु यावेळी या आरतीचा मान शिंदोडीचे माजी सरपंच लक्ष्मण कुदनर यांना मिळाला असून, त्यांनी मोठ्या महाप्रसादाचा देखील आयोजन केलं होतं, तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अधिकराव खेमनर, माजी पंचायत समिती सदस्य संगीताताई कुदनर,सरपंच एकनाथ खामकर, उपसरपंच पोपट सोमाजी कुदणर, माजी सरपंच उत्तम कुदनर, चेअरमन बाबूलाल शेख,मा. सरपंच मनीषा कुदनर, माजी चेअरमन सखाराम दरू कुदनर शालेय,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष कुदनर, मा. अध्यक्ष सुरेश कुदनर. सामाजिक कार्यकर्ते ताराचंद विघे, धोंडीभाऊ नारायण कुदनर,शाळेचे मुख्याध्यापक गागरे तुकाराम लक्ष्मण, माजी चेअरमन भिमराज कुदनर, वंचित बहुजन आघाडीचे नेते दादासाहेब बागुल, शमसुदिन मोमीन,बाबासाहेब कुदनर,ग्रामसेवक येळे, खोसे सर, गळंगे सर लांघी सर, बांगर मॅडम, पायमोडे मॅडम, खोटरे मॅडम.यांची उपस्थिती होती.
तर यावेळी आरतीचे अवचित्य साधत शिंदोडी येथील अध्यात्मिक व शैक्षणिक कार्यामध्ये मोलाचे योगदान म्हणून दाते सुदाम शंकर सर यांचा असून त्यांचा देखील सत्कार शिंदोडी येथील आजच्या आरतीचे मानकरी मा. सरपंच लक्ष्मण कुदनर यांनी गौरव चिन्ह म्हणून ट्रॉफी शाल फेटा नारळ, देऊन सत्कार केला. तर आजचे मानकरी मा. सरपंच लक्ष्मण कुदनर यांचा सत्कार. निवृत्त मेजर जगणाथ खामकर यांनी हनुमान फोटो देऊन सत्कार केला.तसेच शिंदोडी सोसायटीचे चेअरमन बाबूलाल शेख यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत शालेय वस्तू भेट दिल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित झालेल्या मा. सरपंच मनीषा लक्ष्मण कुदनर, मीना विठ्ठल कुदनर, कविता बापू कुदनर, सुवर्णा विजय पिंपळे या महिलांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.
तर अंगणवाडी सेविका म्हणून प्रमिला कुदनर, संगीता कुदनर,
आरोग्य सेविका विद्या शिंदे, आशा सेविका सुनीता पवार, लता बागुल. यांची ही उपस्थिती होती.
