समाजकार्याची नवी दिशा… इनरव्हील क्लब अंबाजोगाईच्या नव्या नेतृत्वाचा उत्साही प्रारंभ !
अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री
इनरव्हील क्लब अंबाजोगाईच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा दिनांक २ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात संगीता नावंदर यांनी नूतन अध्यक्षा म्हणून जबाबदारी स्वीकारत सामाजिक कार्याला नवा गतीमान चेहरा देण्याचा संकल्प केला.
खोलेश्वर महाविद्यालयातील स्व. गोपीनाथ मुंडे सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास आमदार नमिताताई मुंदडा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रारंभी मावळत्या अध्यक्षा सुरेखा शिरसाठ यांनी गतवर्षीच्या उपक्रमांची माहिती देत आपल्या कार्यकाळाचा आढावा मांडला. त्यानंतर त्यांनी क्लबची चार्टर पिन व कॉलर नूतन अध्यक्षा संगीता नावंदर यांच्याकडे सुपूर्त केली.
नवीन अध्यक्षा संगीता नावंदर यांनी आपल्या भाषणात, “समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून सामाजिक कार्य करणार असल्याचा निर्धार केला,” असे स्पष्ट करत क्लबच्या नव्या युगाची सुरुवात केली.
या वेळी आमदार नमिताताई मुंदडा यांनी आपल्या भाषणात, “महिलांनी संघटित होऊन समाजासाठी कार्य करणे ही काळाची गरज असून, इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी जे कार्य केले आहे, ते प्रशंसनीय आहे,” असे सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात सुरेखा बंग या आदर्श अपंग गृहिणीचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय क्लबच्या माजी व आजी पदाधिकाऱ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीतील सचिव कल्पना शिंदे, ट्रेझर जयश्री कराड, आ.एस ओ. रेखा शितोळे, उपाध्यक्ष सुहासिनी मोदी, ईडीटर सुरेखा कचरे, सीसीसी अंजली चरखा यांना पदपिन्स देण्यात आल्या.
कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या सदस्य चंद्रकला देशमुख, वर्षा देशमुख, रेखा तळणीकर, जयश्री लव्हारे, साबणे मॅडम, वर्षा ठाकुर, सुनीता कात्रेला, वर्षा जळकोटे, भावना कांबळे, अनिता फड, तन्वी कमळकर, सुलोचना मालवाड तसेच रोटरी क्लब व रोटरॅक्टचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी, पत्रकार सुरेश मंत्री, सामाजिक कार्यकर्त्या अनिता कांबळे, नगरसेविका संगीता व्यवहारे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
कार्यक्रमाचे संचालन अंजली निर्मळे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर शेवटी सुवासिनी मोदी यांनी सर्वांचे आभार मानले.
क्लबच्या कार्यातून महिला नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर दर्शन घडले!
