संगमनेरच्या साकुर वरुडी फाटा पर्यंत जोरदार पाउस आणि गारपीट!
टोमॅटो सह गहू कांदे  पिकांची नासाडी
संगमनेर लोकवेध live न्यूज 
 पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या  पठार भागातील साकुर फाटा आणि वरुडी फाट्यापर्यंत आज दुपारी जोरदार गारपीट झाली आहे गारपीट आणि पाऊस यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक या भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अचानक पावसाबरोबर गाराही पडू लागल्या. या गारा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडल्या की काही काळ महामार्गावर जिकडे तिकडे गाराच गारा दिसत होत्या
जणू काही निसर्गाने गारांचा सडा पुणे-नाशिक महामार्गावर  टाकला होता. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही थांबली झाली होती. या भागात टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. याच भागात ही प्रचंड गारपीट झाल्याने शेतकन्यांच्या टोमॅटो पिकाला गारपिटीचा मोठा फटका बसला
अचानक वातावरणात बदल होऊन अर्ध्या तासाच्या आत प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गारपिट झाली. हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी गारपिटीचा इशारा दिला होता, तो अखेर तंतोतंत खरा झाला. आज संगमनेर तालुक्याच्या पठार भागाला या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!