निळवंडेच्या पाण्याची दिशा निमगाव जाळी पाझर तलावाकडे अखेर काम मार्गी लागण्याचे संकेत*
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
आज दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता निमगाव जाळी ता.संगमनेर येथील दुधेश्वर पाझर तलावाच्या पाणी प्रश्नासाठी तलावाच्या सांडव्या जवळील गोरक्ष वाडी फाट्याजवळ वंचित शेतकऱ्यांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती.एक्सिक्यूँटिव्ह इंजिनिअर अमोल कवडे साहेब,वलवे साहेब, जलसंपदा विभाग, संगमनेर विभाग, गायकवाड साहेब, इरिगेशन विभाग, दीपक सोनवणे मा. नामदार साहेब यांचे सचिव, जनसेवा कार्यालय यांच्या उपस्थितीतीत,
निमगाव जाळी येथील पाझर तलावात आणि परिसरात पाणी कसे आणता येईल. यासाठी वंचित शेतकऱ्यांच्या समवेत मिटिंग आणि पाहणी..मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील,मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे सूचनेवरून शेतकऱ्यांचे सोबत पाहणी/सर्वे आयोजित केला होता..
जवळ जवळ 95 शेतकरी महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव,शिवाजीराव जोंधळे साहेब आणि प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मछिंद्र थेटे व मान्यवर ग्रामस्थ यांचीही यावेळी उपस्थिती होती. महत्वाचे असे की ताज्या सर्वेअंती ग्रॅव्हीटी ने पाणी पाझर तलावात जाऊ शकते असं अमोल कवडे साहेब यांनी उपस्थित मान्यवर आणि शेतकऱ्यांना सांगितलं तसेच सदर कामासाठी योग्य तो प्रस्ताव तयार करून मा. नामदार साहेब यांना सादर केला जाईल असे सांगितले..
आणि लवकरात लवकर सदर काम कसे मार्गी लावले जाईल हे कटाक्षाने पहिले जाईल..वंचित परिसरातील सर्व उपस्थित शेतकरी मा. नामदार.राधाकृष्ण विखे पाटील साहेब,मंत्री जलसंपदाआणि एक्सिक्यूँटिव्ह इंजिनिअर अमोल कवडे साहेब यांचे
काका तळोले यांनी सदर भेटीचे सकारात्मक फलितासंदर्भात सर्वांचे आभार व्यक्त केले
