श्री बालाजी दूध संस्थेत चेअरमन इंजि. इंद्रधन चौधरी यांचा वाढदिवस उत्साह, प्रेम आणि आनंदाच्या जल्लोषात साजरा

संगमनेर प्रतिनिधी

श्री बालाजी दूध संस्था, कनोली येथे संस्थेचे चेअरमन इंजिनीयर इंद्रधन मारुती चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात, प्रेमळ वातावरणात आणि उत्साहाच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी संस्थेच्या प्रशस्त सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास गावातील नागरिक, संचालक, सभासद, दूध उत्पादक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेअरमन इंद्रभान चौधरी यांचा वाढदिवसानिमित्त इंद्रजीत भाऊ थोरात शरद नाना थोरात यांनी सत्कार केला .

वाढदिवसानिमित्त केक कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, शुभेच्छांचा वर्षाव व आनंदाचे वातावरण पसरले. यावेळी मिनीनाथ वर्पे, संगमनेर कारखान्याचे संचालक सतीश वर्पे, ज्येष्ठ मार्गदर्शक बंडोपंत वर्पे, प्रकाश वर्पे, पाराजी वर्पे, सुरेश कांबळे, सचिव भाऊसाहेब वर्पे, संजय वर्पे, गोरख वर्पे, सागर वर्पे, राजेंद्र वर्पे तसेच सर्व कर्मचारीवृंद, सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांनी इंजि. चौधरी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे, सहकार्यशील स्वभावाचे आणि संस्थेच्या प्रगतीतील मोलाच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी संस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत गावातील शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुले केले, असे गौरवोद्गार सर्व वक्त्यांनी काढले.

इंजि. इंद्रधन चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “संस्था ही आपली परिवाराप्रमाणे आहे. प्रत्येक सभासद, संचालक आणि दूध उत्पादकाच्या सहकार्यामुळेच आज ही संस्था प्रगतीच्या शिखरावर आहे.”

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना स्वादिष्ट अल्पोपहार देण्यात आला. अखेर जयघोष, शुभेच्छांचा वर्षाव आणि आनंदमयी वातावरणात वाढदिवस सोहळा संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!