संगमनेरकर नागरिकांच्या समस्या दूर करा आणि आपल्या कामकाजात सुधारणा करा

आमदार अमोल खताळ यांचे नगर पालिका अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

संगमनेर

संगमनेरला शहरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात एकामागे समस्या व तक्रारी आमदार अमोल खताळ यांच्यापुढे मांडल्या त्यात सर्वाधिक समस्या स्वच्छता व पाण्याच्या संदर्भात होत्या . त्या सर्व समस्या समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात आणि आपल्या कामकाजात सुधारणा करावी आशा सक्त सूचना आ अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे

संगमनेर नगरपालिकेच्या रामकृष्णदास सभागृहामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिकेच्या सर्वच विभागांचा आढावा घेतला असता . या आढाव्यात नागरिकांकडून सर्वाधिक तक्रारी पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या संदर्भात करण्यात आल्या.त्यावरती आ खताळ यांनी समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या समोर प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत या समस्या दोन दिवसात सोडवा अशा सक्त सुचना दिल्या आहेत

अलीकडे काही जणांच्या सांगण्यावरून सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते, मात्र सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ते आंदोलन थांबविण्यात आले होते. संगमनेर शहराच्या स्वच्छतेचा ठेका नाशिकच्या एका कंपनीकडे असला तरी, जर त्या ठेकेदाराकडून शहराच्या स्वच्छतेचे काम समाधानकारक होत नसेल, तर नवीन निविदा काढून ठेकेदार नेमा असे निर्देश आ अमोल खताळ यांनी मुख्याधिकार्यांना दिले आहेत. यावेळी मुख्याधिकारी धनश्री पवार कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ प्राशासन अधिकारी प्रल्हाद देवरे आरोग्य विभागाचे अमजद पठाण पाणीपुरवठा विभागाचे अमृत काजवे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंकज मुंगसे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्याम मिसाळ शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजप शहर आध्यक्ष पायल ताजणे

 

 

संगमनेर शहर अस्वच्छ असतानाही अनेक पारितोषिके मिळवली गेली, पण महायुती सरकारच्या काळात असे प्रकार होऊ देणार नाही,”“निवडणुका आल्या म्हणून रस्ते आणि स्वच्छतेचा दिखावा करणारे काम येथून पुढे होणार नाही. अधिकारी आणि कर्मचार्यांमी आपापल्या विभागाची जबाबदारी नीट पार पाडावी. आमचे कार्यकर्ते तुम्हाला त्रास देत असतील तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, पण जर तुम्ही कुणाचे बाहुले बनून जबाबदारी टाळत असाल, तर अजिबात सहन केले जाणार नाही.”

श्री अमोल खताळ

आमदार संगमनेर विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!