शिवसेना (ठाकरे) प्रणित शिव वाहतूक सेनेचा रिक्षा चालक-मालकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा; पोलीस निरीक्षकांसह तांबे व खताळ दोन्ही आमदारांना निवेदन देऊन अनोखा प्रयोग

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर येथे शिव वाहतूक सेना व रिक्षा सेनेच्या वतीने रिक्षा चालक-मालकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष अशोक बढे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. जिल्हाप्रमुख श्री.सचिन कोते पाटील व उपजिल्हाप्रमुख श्री.अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने शहर पोलिस निरीक्षक बारवकर, तसेच आमदार श्री.अमोल खताळ आणि अपक्ष आमदार श्री.सत्यजितदादा तांबे यांना संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोर्चाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख व तालुकाध्यक्ष अशोक बढे यांनी केले. यावेळी उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, भीमाशंकर पावसे, शहरप्रमुख अमित चव्हाण व फैसल सय्यद यांनी सदरील नियोजन केले.

*अन्यायकारक दंडाविरोधात संताप*

प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कडून ‘मार्च एंड’च्या नावाखाली रिक्षा चालकांवर ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात असल्याचा आरोप करण्यात आला. रिक्षा चालकांचा महिन्याचा सरासरी उत्पन्न १५ हजार रुपये असून त्यातून घरखर्च, शिक्षण, आरोग्य व कर्जाच्या हप्त्यांचा भार सांभाळणे कठीण होत असल्याचे सांगण्यात आले.

पासिंग संपलेली किंवा पीयूसी नसल्यास ताकीद देऊन सोडण्याची मागणी करण्यात आली. स्पर्धेच्या युगात रिक्षा व्यवसाय परवडत नसल्याने सकाळच्या कॉलेजच्या वेळेत एखादी अतिरिक्त सीट भरली जाते, त्यावेळी आकारण्यात येणारा दंड हा खूप मोठा असतो असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

*अन्यथा, १ मार्चपासून बंदचा इशारा*

मागण्या मान्य न झाल्यास व अन्यायकारक दंडवसुली थांबवली नाही तर १ मार्चपासून संगमनेर शहर व तालुक्यात एकही रिक्षा रस्त्यावर धावणार नाही, तसेच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

विषय गंभीर तेथे ठाकरेंचे शिवसैनिक खंबीर” असा संदेश यावेळी देण्यात आला.

[विशेष म्हणजे, ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नेहमी सकारात्मक मदत करणाऱ्या अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबतच शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनाही त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेटून निवेदन देत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. व दोन्हीकडील शिवसैनिक पहिल्यांदाच भेटल्याने मोठा चर्चेचा विषय ठरले आहे.]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!