शेवाळे व देशमुख परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
टाकळी जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पारितोषिके
अकोले :
अकोले तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शेवाळे व देशमुख परिवारातर्फे प्रेरणादायी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी गावचे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व शिक्षणतज्ज्ञ पोपटराव शेवाळे होते. त्यांनी शिष्यवृत्ती व विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून उत्तम दर्जाच्या दप्तरांचे वाटप केले.
यावेळी टाकळी जिल्हा परिषद शाळेचे ज्येष्ठ प्राथमिक शिक्षक संजय देशमुख यांनी आपले वडील कै. प्रकाश पंढरीनाथ देशमुख यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती तसेच SSC परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुंदर व प्रेरणादायी ट्रॉफी देऊन सन्मानित केले. गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या या प्रोत्साहनामुळे त्यांचा स्वातंत्र्यदिन विशेष संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर संगीत कवायत तसेच विविध नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून CRPF भोपाळचे मेजर मिलिंद पवार, मेजर भाऊसाहेब दिघे तसेच होमगार्ड सेवक कु. कोमल घोलप उपस्थित होते. याशिवाय ग्रामपंचायत टाकळीचे सरपंच दत्तू भाऊ गरूड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब फोडसे, उपाध्यक्ष रोहिणी पवार यांच्यासह रामहरी तिकांडे, संतोष तिकांडे, दादा पाटील तिकांडे, दत्ताराम दातखिळे, विजय दातखिळे, बाळासाहेब दातखिळे, संतोष नाईकवाडी, माधुरी दातखिळे, विद्या तिकांडे, डॉ. उज्ज्वला वैद्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टाकळी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार, सहशिक्षक संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे, संगिता धिंदळे, कैलास झोळेकर तसेच टाकळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व सहशिक्षक शुभांगी साबळे, कल्पना पवार, श्रीकांत मेंगाळ व प्रविण आल्हाट यांनी विशेष परिश्रम घेतले.
टाकळी शाळेने जल्लोषमय व आदर्शवत वातावरणात साजरा केलेल्या स्वातंत्र्यदिनाचे अकोले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी डॉ. बाळासाहेब दोरगे, देवठाण बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड व केंद्रप्रमुख रोहिणी खतोडे यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले.
