पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल
मतदारसंघनिहाय उमेदवारांची नावे जाहीर; छाननीनंतर निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट
पिंपरणे :
पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, पिंपरणे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगरच्या सन २०२६-२७ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी संपली असून, विविध मतदारसंघांतून एकूण ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक कार्यालयात होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि. २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मतदारसंघनिहाय उमेदवार सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मतदारसंघ :
१) देशमुख काकासाहेब मधुकर २) ठोंबरे भास्कर चिमण ३) ठोंबरे सुभाष रामराव ४) मांडे बाळासाहेब कान्हू ५) देशमुख प्रशांत शंकराव ६) राहिंज बाळासाहेब पंढरीनाथ ७) खडांगळे पांडुरंग काशीनाथ ८) वाकचौरे दादाभाऊ नामदेव ९) देशमुख भिकन बाबुराव १०) देशमुख दिलीप मानशिंग ११) वाकचौरे आण्णा नामदेव १२) देशमुख राजेंद्र भैयासाहेब १३) देशमुख मदन रामराव १४) रक्टे रावसाहेब चांगदेव १५) काळे वामन महादू १६) गायकवाड बाळासाहेब जनाजी १७) देशमुख राजेंद्र सयाजी १८) देशमुख सुभाष भुजंगराव १९) ठोंबरे चंद्रभान महादू २०) देशमुख नानासाहेब शंकरराव
विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघ :
१) राहिंज सोमनाथ बाळासाहेब २) राहिंज संपत प्रभू इतर मागासवर्गीय प्रवर्ग : १) काळे विलास भागवत २) दिवेकर बबन निताराम
महिला राखीव मतदारसंघ :
१) देशमुख उषा आप्पासाहेब २) रक्टे प्रगती सोमनाथ ३) देशमुख तेजस्वी अजित ४) पवार चंद्रकांत बाळासाहेब ५) रोहम तेरजा अशोक ६) राहिंज शेवंताबाई चंद्रभान
अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग :
१) बागुल सुभाष तात्याबा २) गायकवाड बाळासाहेब जनाजी ३) साळवे बाळू लिंबा
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता सर्वांचे लक्ष अर्जांच्या छाननीकडे लागले आहे. छाननीनंतर वैध उमेदवारांची संख्या स्पष्ट होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. संस्थेच्या संचालक मंडळासाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले असून, अंतिम निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहणार, याची उत्सुकता सभासदांमध्ये निर्माण झाली आहे. छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
