शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  शाखा उद्घाटनाचा विक्रम संगमनेरत एका दिवसात पंधरा शाखांचे उद्घाटन

शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बबन नाना घोलप यांच्या हस्ते १५प्रभागात १५ शाखांचा शुभारंभ!

लोखंडी पाट्या आणि त्यावरील शिवसेनेचा वाघ ठरला आकर्षणाचा विषय.

संगमनेर ; लोकवेध live न्युज / अण्णासाहेब काळे

शिवसेनेत झालेल्या बंडखोरी नंतर आता जिंके पर्यंत लढायचं हा आदेश मानून संगमनेर शहर शिवसेना (ठाकरे) गटाच्या वतीने शहरात एकाच दिवसात १५ प्रभागात १५शाखांचा शुभारंभ करण्यात आला असून आगामी काळात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने सक्षम संघटनात्मक बांधणी करून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करायचा असा संकल्प शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी केला होता. तो पूर्ण केल्या मुळे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बबन नाना घोलप यांनी शहर प्रमुख अमर कतारी यांची पाठ थोपटत कौतुक केले, शिवसेनेत झालेल्या गद्दारीचा राज्यासाह शिर्डी लोकसभेत देखिल प्रभाव पडला व विद्यमान खासदारांनी ठाकरेंसोबत गद्दारी करणे पसंद केले ही गोष्ट निष्ठावंत शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली व पक्ष नेतृत्वाने देखिल शिर्डी लोकसभेतील सर्व सूत्र माजी मंत्री लोकसभा संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांच्याकडे दिली. त्या अनुषंगाने त्यांनी धाडसी व प्रभावी निर्णय घेत संघटनेत फेरबदल केले व नवचैतन्य निर्माण झाले असून सर्व नव्या जुन्या निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेत संगमनेर शहर व तालुक्यात घोलप नाना यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्क प्रमुख अजय व्हनोळे व जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, संजय फड यांच्या सूचनेनुसार

शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांनी शहरातील पंधरा प्रभागात शाखा उभारणीचा कार्यक्रम हाती घेत शहरातील, रंगार गल्ली माळीवाडा संजय गांधी नगर मोमीनपुरा इंदिरानगर जनता नगर छत्रपती शिवाजीनगर मालदाड रोड, विद्यानगर, अलका नगर मदिना नगर, तेली खुंट, कुंभाराळा परिसर नेहरू चौक साईनगर व घोडेकर मळा परिसरात पंधरा शाखा उभारल्या व  शहरातील पंधरा शाखांचा लोखंडी बोर्ड लावून त्याचे अनावरण आणि उदघाट्न मोठ्या उत्साहात शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बबनराव नाना घोलप व विधानसभा संपर्क प्रमुख अजयजी व्हनोळे यांचे शुभहस्ते करण्यात आले. शहरातील रंगारगल्ली येथून शाखा शुभारंभाची सुरुवात करत शहरातील सर्वच प्रभागात स्थानिक नागरिक, ठाकरेप्रेमी आणि शिवसैनिकांनी स्वागत करत ह्या शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. संकट काळात पक्षनेतृत्वाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून दिलेला शब्द पाळल्या बद्दल शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांचे सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. यावेळी सर्वच शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, आणि शहर कार्यकारिणी यांच्या माध्यमातून शहरात संघटनात्मक तसेच लोकहिताचे काम करण्यासाठी शहर शिवसेना काम करण्यास तत्पर असल्याचे मत कतारी यांनी व्यक्त केले.


शाखा शुभारंभाच्या मोठ्या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न शिवसेना शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांच्या सह शहरसमन्वयक असिफ तांबोळी ,शहर संघटक दीपकजी साळुंखे ,उप शहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी , उपशहर प्रमुख दीपक वन्नम, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, तसेच युवा सेना शिवसेना महिला आघाडी सर्व ज्येष्ठ शिवसैनिक आजी-माजी पदाधिकारी यांनी घेतले तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड, पठार भाग युवासेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, लक्ष्मण सोनर ,विजय सातपुते, बाळासाहेब कवडे ,शरद कवडे ,सदाशिव हासे, व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांनी मोलाचे सहकार्य केले. कोपरगाव विभागाचे जिल्हाप्रमुख मा.प्रमोद अण्णा लबडे हे विशेष उपस्थित होते. तसेच महिला आघाडीच्या शितल ताई हासे ,आशा केदारी ,संगीताताई गायकवाड, युवा सेनेचे अमित चव्हाण जालिंदर लहामगे, अमोल डुकरे सचिन साळवे परवेज शेख योगेश बिचकर संभव लोढा रिक्षा सेनेचे अशोक बडे अक्षय बिल्लाडे अमोल डुकरे गोविंद नागरे विभाग प्रमुख प्रवीण चव्हाण विशाल बापते प्रशांत खजुरे विजय भागवत माधव फुलमाळी जयदेव यादव प्रशांत कपूर प्रतीक गाडेकर ओंकार सस्कर, अल्ताफ शेख सुशांत भावसार लिंगमूर्ती चिंता वैभव अभंग समीर तांबोळी शाखाप्रमुख जितेंद्र दर्बे नितीन अनाप प्रकाश चोथवे अजित मोमीन मुस्लिम मावळा संजय भागवत, तिलक गांधी, अनिल खुळे, ज्ञानेश्वर दुस्सा, ब्रह्मा खिडके मोहसीन शेख, अक्षय गाडे आनंद नागरे,रहिम बॅग कुमार कुडके गौरव काळे सलमान शेख आयुब शेख हर्षद सय्यद श्याम ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद कुलट संजय कबाडे सुदर्शन रोहित निराली अक्षय गुंजाळ दानिश खान, नितीन हासे फैसल सय्यद फरोज कतारी मुकेश काठे सागर शेंडे, विक्रम कतारी त्रीलोक कतारी आलेख कुदळ केवल कतारी ,प्रसन्न गोरे, आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!