वादळी वाऱ्याने अंभोरेतील शाळा खोल्यांचे पत्रे उडाले!

वर्गखोल्यांमधील शैक्षणिक साहित्यांचे मोठे नुकसान
संगमनेर  / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील अंभोरे परिसरात  झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने डागवाडी व अंभोरे या दोन्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचे पत्रे उडाले असून खोल्यांमधील शैक्षणिक साहित्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अंभोरे गावात अंभोरे व डागवाडी या पहिली ते चौथी पर्यंत दोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेजारीच आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळी वारे मोठ्याप्रमाणात झाले त्यामुळे डागवाडीच्या चार वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेले असून भींतींनांही तडे गेले आहे त्याच बरोबर वर्ग खोल्यांमध्ये असलेल्या शैक्षणिक साहित्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.तसेच अंभोरेही शाळेच्या एका वर्ग खोलीचे पत्रे उडाले असून याही ठिकाणी शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे.
 काही वर्गखोल्यांचे पत्रे उडून थेट आतमध्ये पडले आहे. सकाळी घटनेची माहिती समजताच केंद्रप्रमुख संजय बोरसे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्यासह नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली.त्यानंतर नुकसान झालेल्या वर्ग खोल्यांची पाहणी केली त्यानंतर पंचनामा केला.वादळी वाऱ्याने दोन्ही शाळेंच्या वर्ग खोल्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना कुठे बसवयाचे असा प्रश्नही शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!