तीगाव येथे वादळाने कल्पना सुभाष घनदाट यांच्या घराचे प्रचंड नुकसान..

अँगलसह ३०० फूट अंतरावर ४० पत्रे उडुन रस्त्यावर पडले

संगमनेर / लोकवेध live न्यूज

संगमनेर तालुक्यातील तीगाव येथे वादळाने कल्पना सुभाष घनदाट यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.
वादळ इतके प्रचंड होते की, अँगलसह ३०० फूट अंतरावर ४० पत्रे उडुन रस्त्यावर पडले. सिताफळ बाग,बांबू झाडांचेही नुकसान झाले.

धनगर वाडा परिसरतील सदर घरामध्ये सुदाम एलके व त्यांचा परिवार हे वाटेकरी राहत होते. तसेच त्यांच्या तीन गाया, पाच शेळ्या, दोन लहान मुलांसह पाच जण कुटुंबात होते. संध्याकाळी सहाच्या दरम्यान वादळ सुरू असताना ही सर्व मंडळी घरामध्ये बसली होती. वादळाचा वेग खूप वाढला.. पत्रे उडायला लागल्यामुळे हे सर्वजण तात्काळ घरासमोरील शेडमध्ये येऊन थांबली. आणि त्याच वेळेला प्रचंड आवाज होत 40 पत्रे व प्रचंड वजनाच्या अँगल सर्व उडून तीनशे फूट अंतरावर रस्त्यावर सीताफळाच्या बागेत जाऊन पडले.
नशीब बलवत्तर म्हणून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र घराचे अँगलसह प्रचंड नुकसान झाले आहे. सदर नुकसान पाहणी होऊन भरपाई मिळावी अशी मागणी सौ.कल्पना घनदाट यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!