अजित पवारांनी सोशल मीडियाच्या प्रोफाईलवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख वगळला ; सोशल मीडियावर चर्चेला उधान
अजित पवार यांच्या मनात नेमकं काय
मुंबई / लोकवेध live न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. येत्या काही दिवसात मोठा राजकीय स्फोट होणार असल्याच्या शक्यता वर्तविला जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल वरून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख वगळण्यात आला असून हे प्रोफाइल पूर्णतः रिकामे ठेवण्यात आले आहे. यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले आहे.
शिखर बँक प्रकरणाच्या आरोप पत्रातून अजित पवार यांचे नाव वगळल्याच्या बातम्या आल्यानंतर अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चा •आणखी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मुंबईत बोलविण्यात आल्याने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट घेऊन फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची सत्ता वाटपाची बोलणी झाल्याचे देखील बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचे सरकार स्थापन करणाऱ्या अजित पवार यांचे सोशल मीडिया प्रोफाइल चर्चेत आले. असून अजित पवार यांच्या मनात नेमके काय चालले आहे, ते नेमका काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
