देवगड विद्यालयाचे कार्यतत्पर-कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री.रमेश भास्कर पावसे सर यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे

जनता शिक्षण प्रसारक मंडळ चंदनापुरी संचलित, देवगड विद्यालय हिवरगाव पावसा विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय, कर्तव्यदक्ष सन्माननीय मुख्याध्यापक श्री.रमेश भास्कर पावसे सर यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी स्वागतगीत व प्रार्थना गायनाने वातावरण मंगलमय झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.आनंदराव कढणे साहेब होते .श्री पावसे सर हे 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेतर्फे शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र अर्पण करून श्री राजेंद्र राहाणे साहेब मुख्य अभियंता,महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण,पुणे यांनी सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.रणजितसिंग माचरेकर (उपमृदा सर्वेक्षण अधिकारी,पुणे) डॉ.श्री.अजित मधुकर वाळे ( मुख्य कार्यकारी अधिकारी,इंडसिस सॉफ्ट इंडिया पुणे ), संस्थेचे अध्यक्ष श्री.कढणे साहेब, श्री.एम.एम.फटांगरे सर, डॉ.श्री.रमेश सहादू पावसे सर , डॉ.श्री.प्रमोद पावसे ,ॲड श्री.भगवान उऱ्हे साहेब आदी मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मुलांचे पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतील, तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. फुलाला सुगंध मातीचा, गाईला सुगंध वासराचा, गवयाला सुगंध गाण्याचा त्याचप्रमाणे शिक्षकाला सुगंध विद्यार्थ्यांचा. नितीमूल्याने परिपूर्ण असे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असे फटांगरे सर यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमाचे धडे न देता मौलिक मूल्यांची, थोर विचारांची रुजावत करावी त्यासाठी शिक्षकाने चौफेर विविधांगी वाचन करावे, बदलते तंत्रज्ञान आत्मसात करावे असे मत श्री.राजेंद्र रहाणे साहेब यांनी व्यक्त केले.
सन्माननीय मुख्याध्यापक श्री रमेश भास्कर पावसे सर यांनी केलेल्या सत्काराचा स्विकार करून आपल्या मनोगतातून सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सेवाकाळात कुटुंबीयांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. संस्थेने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करून सेवा अर्पण केली, यातून मलाही समाधान मिळाले अशी भावना सरांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी शालेय इमारतीच्या रंगरंगोटीसाठी मदत केली, त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयासाठी एक संगणक तसेच गावातील प्राथमिक शाळेसाठी एक संगणक देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व अनेक मान्यवरांनी सरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू, सरांच्या सेवाकाळातील विविध प्रसंग यांचे विवेचन, त्यांच्या सहवासातील विविध क्षण, सरांच्या जीवनपटातील विविध आठवणींना भावुक होऊन उजाळा दिला आणि सरांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी सरांचे अनेक आप्तेष्ट, आजी-माजी विद्यार्थी गावातील ग्रामस्थ, अनेक संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्वांसाठी उत्तम अशी स्वादिष्ट स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.या प्रसंगी हिवरगाव पावसा गावचे सरपंच श्री.सुभाष गडाख सर , उपसरपंच सौ.सुजाता दवंगे, गटशिक्षणाधिकारी श्रीम. सुवर्णा फटांगरे मॅडम, केंद्रप्रमुख श्री.बाळासाहेब जाधव सर ,श्री.भगवान उऱ्हे साहेब,संस्थेचे सर्व पदाधिकारी ,विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक,ग्रामपंचायतीचे सदस्य , विविध संस्थांचे पदाधिकारी,विश्वस्त उपस्थित होते. मंगलमयी प्रसन्न तसेच भारावलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष निवड श्री.राहाणे एस.एम सर, तर अनुमोदन श्री थोरात दिनेश सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती हांडे मॅडम, सन्मानपत्राचे वाचन श्री.मदन माने सर, सुत्रसंचलन श्री सर्जेराव वाघ सर व श्रीमती.भालेराव मॅडम यांनी केले.तर भोजन व्यवस्था नियोजन श्री.वसंत नेहे सर ,श्री.अक्षय तोरकडी सर,श्री.किरण शेळके सर, श्री.शांताराम पवार मामा आणि रविंद्र भालेराव मामा यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!